केरीतील साईबाबा मंदिर परिसराचं सुशोभिकरण

जिल्हा पंचायत निधीतून करणार सुशोभिकरण; जि.पं.स. रंगनाथ कलशावकरांनी हाती घेतलं काम

मकबूल | प्रतिनिधी

पेडणेः हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर यांनी जिल्हा पंचायत निधीतून विकास कामांचा शुभारंभ केला. केरी पवनवाडा प्रभाग क्र. 4 मधील साईबाबा मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचं तसंच पेव्हर्स बसवण्याच काम त्यांनी हाती घेतलंय. या कामाचा शनिवारी शुभारंभ करण्यात आला.

हेही वाचाः राज्यात 100 टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य होईपर्यंत संचारबंदी वाढवा

मान्यवरांची उपस्थिती

आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर यांनी साईबाबा मंदिराच्या सुशोभिकरणाच्या कामाचा नारळ वाढवला. यावेळी उत्तर जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष कार्तिक कुडणेकर, सुर्ल-पाळी जिल्हा पंचायत सदस्य दिपक सुर्लकर, मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगांवकर, केरी तेरेखोल पंचायतीचे सरपंच सुरेश नाईक, उपसरपंच सौ. आकांक्षा शिरगांवकर, पंच सदस्य सुरज तळकर, कोरगांव पंचायतीच्या सरपंच स्वाती गवंडी, पंच उदय पालयेकर, अब्दुल नाईक, कुस्तान कुयेलो, उमा साळगांवकर, प्रमिला देसाई, पालये पंचायतीचे सरपंच उदय गवंडी, आनंद शिरगांवकर, उल्हास देसाई यांची उपस्थिती होती.

हेही वाचाः अर्थकारणाला गती देण्याची गरज; स्थानिक लोकांचे व्यवसाय सुरु केले पाहिजेत

12 लाख रुपये खर्च मंदिराचं सुशोभिकरण

उत्तर गोव्यातून केरी गावात जिल्हा पंचायतीच्या कामांना सुरुवात करण्यात आलीये. या मंदिराच्या सुशोभिकरणाचं काम 12 लाख रुपये खर्च करून करण्यात येणार आहे. उत्तर गोव्यासाठी जिल्हा पंचायत निधीतून 35 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळावी आहे. लवकरच या कामांची सुरुवात होणार आहे. कोविड-19 महामारीमुळे जिल्हा पंचायतीच्या विकास कामांमध्ये खंड पडला होता. यानंतर सरकारच्या सहकार्याने आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रयत्नातून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निधीतून अनेक विकास कामं हाती घेतली जाणारेत, असं कार्तिक कुडणेकर म्हणाले. यावेळी त्यांनी कलशावकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सर्वांच्या सहकार्याने साधणार विकास

सर्वांच्या सहकार्याने मी हरमल मतदार संघाचा विकास साधण्यास प्राधान्य देणार आहे. उत्तर गोवा जिल्हा पंचायत आणि राज्य सरकारच्या पाठबळातून येथील विकासाला गती मिळणार आहे, असं जी.पं.स. रंगनाथ कलशावकर म्हणाले.

हेही वाचाः ब्रेकिंग! कर्फ्यू ७ दिवसांनी वाढवला, तर अत्यावश्यक दुकानांनाही अल्पसा दिलासा

यावेळी सरपंच सुरेश नाईक, उदय गवंडी यांनी कलशावकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आनंद शिरगांवकरांनी उपस्थितांचं स्वागत केलं. तसंच कलशावकरांना शुभेच्छा देऊन केरी तेरेखोल पंचायत क्षेत्रातून विकास कामांचा शुभारंभ केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!