केरये – खांडेपार येथे प्राणी मित्रांना मारहाण

फोंडा पोलिसांकडून संशयितांना अटक

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडाः उसगाव येथील आरोग्य केंद्राजवळ सापडलेला साप पकडून नेणाऱ्या प्राणी मित्रांना सोमवारी संध्याकाळी केरये – खांडेपार येथे स्थानिकांनी मारहाण केली. फोंडा पोलिसांनी या प्रकरणी अँथनी गोम्स (५५ , रा. केरये- खांडेपार) आणि डॉम्निक मोम्स (४१. स. केरय) यांना ताब्यात घेतलं.

केरये येथे केली मारहाण

तिस्क -उसगाव आरोग्य केंद्राजवळ साप पकडून जणी मित्र मोशन गावाडे आणि त्यांचे एक सहकारी माघारी फिरत असताना केरये येथे थांबले असता अँथनी आणि डॉम्निक यांनी त्यांना हटकून पकडलेला तो साप त्या भागात सोडण्यासाठी आल्याचा ठपका ठेवून मारहाण केली. या मारहाणीत मोहन गावडे यांच्या डोक्यावर तीन टाके पडले असून पिशवीत बंद केलेल्या सापाला संशयितांनी ठार मारले. या प्रकारानंतर प्राणीमित्रांनी फोंडा पोलिसांत तक्रार दाखल केली.

प्राणी मित्र चरण देसाई यांनी व्यक्त केला रोष

प्राणी मित्र चरण देसाई यांनी या प्रकाराबहल रोष व्यक्त करताना हा प्रकार पूर्णपणे चुकीचा असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!