काळजी घ्या! गोव्यात पुढील पाच दिवस उकाड्याचे…

गोमंतकीय जनता उकाड्याने हैराण

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : वातावरणात झालेल्या बदलामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील उकाड्यात कमालीची वाढ झालेली आहे. मंगळवारी राज्यातील कमाल तापमान ३४ अंश डिग्री सेल्सिअस होते. परंतु, गेल्या एप्रिलमध्ये तापमान ३६ अंश डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक राहिलेले होते. एप्रिलमध्ये बरेच दिवस उष्णतेची लाट होती. त्यामुळे गोमंतकीय जनता उकाड्याने हैराण झालेली होती.
हेही वाचाःझुआरी केमिकल्समध्ये भीषण स्फोट ; तीन ठार…

उष्णतेत वाढ होण्याचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उकाड्यामुळे गोमंतकीय जनता अगोदरच हैराण झालेली असतानाच, पुढील पाच दिवस राज्यातील उष्णतेत एक ते दोन अंश डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज राज्य हवामान विभागाने वर्तवला आहे.
हेही वाचाःदोन ट्रकचा अपघात ; एक रस्त्याच्या बाजुला कलंडला…

पाऊस नसला तरी उकाडा कायम

मध्यंतरीच्या काही दिवसांत विविध भागांमध्ये वादळी​ पावसानेही हजेरी लावली. पावसासोबत आलेल्या वादळामुळे अनेक भागांतील ववजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांची अवस्था ‘आगीतून फुफाट्यात’ अशीच झालेली होती. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस नसला, तरी उकाडा कायम आहे. परंतु, बुधवारपासून उकाड्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्याने अनेकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचाःकोर्ट जो निर्णय देईल तो मान्य!…

बहुतांशी समुद्र किनारे हाऊसफुल्ल

दरम्यान, वाढत्या उकाड्यापासून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी गोमंतकीय नागरिकांनी सायंकाळच्या वेळी समुद्र किनाऱ्यांवर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. पर्यटक आणि स्थानिकांच्या वाढत्या गर्दीमुळे बहुतांशी समुद्र किनारे हाऊसफुल्ल झाले आहेत. सोबतच राज्यातील थंड पेयांच्या दुकानांवरही गर्दी उसळत आहे.
हेही वाचाःकुंडई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी संजय भंडारी…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!