मतभेदांमुळे पक्ष रसातळाला जाणार नाही, याची काळजी घ्या

आता आमदार मडकईकरांनी भाजपला पकडले कोंडीत

Goan Varta Live | प्रतिनिधी

जुने गोवे: भाजप उमेदवारांसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संघटितपणे काम केलं पाहिजे. गटबाजीमुळे काँग्रेस, मगोपसारखे पक्ष रसातळाला गेल्याचं सर्वांनी पाहिले आहे. तसे प्रकार भाजपमध्ये होऊ नयेत, यासाठी सर्वच नेत्यांनी खबरदारी घ्यायला हवी, असा सल्ला आमदार पांडुरंग मडकईकर यांनी भाजपला दिला आहे.

हेही वाचाः आतापर्यंत दोन्ही डोस घेतलेल्या ११ जणांचा कोविडमुळे मृत्यू!

प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी गुरुवारी कुंभारजुवे मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी काही भाजप कार्यकर्त्यांनी सिद्धेश नाईक यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. या पार्श्वभूमीवर तेथील बैठकीत आमदार मडकईकर यांनी वरील सल्ला दिला. विधानसभा निवडणूक आपण कुंभारजुवे मतदारसंघातून भाजपच्याच उमेदवारीवर लढवणार आहे. आपल्या उमेदवारीबाबत आपण स्वत:हून सांगण्यापेक्षा पक्षानेच त्यावर निर्णय घ्यायला हवा असे म्हणत, मडकईकर यांनी प्रदेशाध्यक्ष तानावडे यांना कोंडीत पकडलं.

कुंभारजुवे मतदारसंघात निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिद्धेश नाईक यांचं नाव भाजप उमेदवारीसाठी चर्चेत येत आहे. त्यामुळे भविष्यात कुंभारजुवेतील राजकारणही तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचाः अदानींनंतर आता अंबानींचा धमाका; ‘ही’ कंपनी रिलायन्सच्या ताब्यात

माझ्या उमेदवारीबाबत पक्षानेच ठरवावं!

आपण भाजपचा निष्ठावान नेता आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक भाजपच्याच उमेदवारीवर लढवणार आहे. आता पक्षाने आपल्याला उमेदवारी द्यायची की आपण स्वत: पक्षाकडे उमेदवारीची मागणी करायची हे पक्षालाच ठरवावं लागेल, असं मडकईकर यांनी म्हटलं आहे.

हा व्हिडिओ पहाः VIOLENCE AGAINST WOMEN | महिन्याकाठी महिलांवरील अत्याचाराच्या 20 घटना

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!