बार्देश तालुक्यामध्ये अजून 16 मायक्रो कंटेन्मेन्ट झोन

कळंगुट, साळगांव, थिवी व पर्वरी मतदारसंघांचा समावेश

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा : कोरोना रूग्णांमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे कळंगुट, साळगांव, थिवी आणि पर्वरी मतदारसंघातील 16 ठिकाणी मायक्रो कंटेन्मेन्ट झोन जाहीर करण्यात आलेत. उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी हा आदेश जारी केला आहे.

कोणत्या मतदारसंघात कसे कुठे मायक्रो कंटेन्मेन्ट झोन आहेत, त्यावर एक नजर टाका.

कळंगुट मतदारसंघात गौरावाडा कळंगुट, सीमवाडा हडफडे, सालपे, पिंटोसवाडा व खोब्रावाडा कांदोळी, लोबोवाडा व भाटीवाडा पर्रा,

साळगांव मतदारसंघात वान्सियोवाडा गिरी, आराडी गिरी, पिकेन मरड साळगांव, मुड्डोवाडा साळगाव, तुंटवाडा रेईस मागूस, भाटीवाडा नेरूल.

थिवी मतदारसंघात हाऊसिंग बार्डे कामुर्ली, तारवाडा कोलवाळ, वाडी नादोडा व कैलासनगर अस्नोडा.

पर्वरी मतदारसंघात हाळीवाडा बिठ्ठोण.

या क्षेत्रासाठी जिल्हाधिकार्‍यांनी रॅपिड एक्शन फोर्सची नियुक्ती केली आहे. यात उपजिल्हाधिकारी, पोलिस, आरोग्य केंद्र, पंचायत सचिव, अग्निशमन दल, मामलेदार व नागरी पुरवठा खात्याचे निरीक्षक यांचा समावेश आहे. दरम्यान, यापूर्वीच जिल्हाधिकार्‍यांनी म्हापसा आणि शिवोली मतदारसंघातील 16 परीसर लघु प्रतिबंधित क्षेत्र, म्हणजेच मायक्रो कंटेन्मेन्ट झोन म्हणून घोषित केलेला आहे. त्यामुळे आता ३२ मायक्रो कंटेनमेन्ट झोन झाले आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!