टॅक्सीवाल्यांचा ‘बाप्पा’ अटकेत!

बाप्पा कोरगावकर यांना पर्वरी पोलिसांकडून अटक

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : अ‍ॅप आधारित टॅक्सीसेवेविरोधात आंदोलन करणार्‍या टॅक्सीवाल्यांपैकी प्रमुख नेते बाप्पा कोरगावकर यांना पर्वरी पोलिसांनी अटक केली. करमळीतील सुदिन नाईक यांनाही पोलिसांनी अटक केलीय.

पर्वरी पोलिसांनी शनिवारी बाप्पा यांना ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली. त्यानंतर काही टॅक्सीवाल्यांनी पर्वरी पोलिस स्टेनशमध्ये धाव घेतली. पोलिस निरीक्षकांनी बाप्पा यांना न्यायालयासमोर हजर करणार असल्याची माहिती टॅक्सीचालक ‘मोगॅम्बो’ योगेश यांनी दिली.

बाप्पाला अटक झाल्यानं टॅक्सीचालक संतप्त

कोविडची परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्यानं सरकारनं 144 कलम लावलं. त्यानंतर बाप्पा कोरगावकर आणि अन्य टॅक्सीचालकांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र बाप्पा यांना अटक झाल्यानं टॅक्सीचालक संतप्त झाले आहेत. आम्ही सरकारच्या निर्देशांचा मान ठेवून आंदोलनासाठी गर्दी न करण्याचा निर्णय घेऊन सरकारला सहकार्य केलं. मात्र पोलिसांनी दादागिरी करून बाप्पा आणि सुदिन नाईक यांना अटक केल्यानं टॅक्सीवाल्यांनी नाराजी व्यक्त केलीय.

‘या’ कारणामुळे झाली अटक…

नेरूल येथे सुरू असलेल्या बालाजी टेलीफिल्मच्या शुटींगसाठी बाहेरून टॅक्सी मागवल्यामुळे बाप्पा कोरगांवकर आणि त्यांच्या साथीदारांनी तोडफोड केली. बेकायदा जमाव करणे, तोडफोड करणे, शुटींगला अडथळा आणणे अशा कारणांखाली पर्वरी पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत. कोरगांवकर आनी सुनील नाईक यांची चौकशी सुरू आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!