बनावट विक्री कागदपत्रे करून फसवलं बँकेला…

संशयित सुनील देसाईला अटक, ४ दिवसांची काेठडी

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्को : फ्लॅटसंबंधीची बनावट विक्री कागदपत्रे तयार करून येथील सिटिझन्स क्रेडिट को-ऑप. बँक लिमिटेडकडे तारण ठेऊन कर्ज घेऊन बँकेची फसवणूक करणाऱ्या सुनील एस. देसाई या संशयिताला वास्को पोलिसांनी अटक केली. अभिषेक कुमार राय या हमीदाराच्या कागदपत्रांचा वापर करून सदर घोटाळा केल्याचेही समोर आले आहे. गेले काही महिने तो पोलिसांपासून दूर पळत होता. त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
हेही वाचा:उच्च न्यायालयाचा सरकारला झटका! ‍

फेब्रुवारी २०२१ मध्ये तक्रार केली होती नोंद

फ्लॅटसंबंधीचे बनावट विक्री कागदपत्रे तयार करून बँकेची फसवणूक करून कर्ज घेतल्याप्रकरणी सिटिझन्स क्रेडिट को-ऑप. बँक लिमिटेडचे व्यवस्थापक आगुस्तिन फर्नांडिस यांनी वास्को पोलीस स्थानकामध्ये ५ फेब्रुवारी २०२१ला तक्रार नोंद केली होती.
हेही वाचा:UPDATES | दुपारच्या ठळक घडामोडी… ‍

फ्लॅट तारण ठेऊन बँकेकडून २९ लाख ४८ हजार रुपयांचे घेतले तारण कर्ज

१२ मे २०१४ रोजी उदय देसाई व सुनील देसाई यांनी बँकेकडे दाबोळी येथील दोन फ्लॅट तारण ठेऊन बँकेकडून २९ लाख ४८ हजार रुपयांचे तारण कर्ज घेतले होते. सदर कर्ज उदय देसाई याच्या नावावर घेण्यात आले होते. त्यासाठी त्यांनी जे कागदपत्रे बँकेला सादर केली होती. ती कागदपत्रे बनावट असल्याचे उघडकीस आल्यावर तक्रार करण्यात आली. वास्कोचे उपअधीक्षक राजेश कुमार व निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहन नागेशकर, स्वप्निल नाईक, हवालदार दामोदर मयेकर, संतोष भाटकर, सचिन बांदेकर, शिपाई रोहन गोवेकर व गौरिश सातार्डेकर यांनी सुनील याला अटक करण्याची कामगिरी केली. सानिल देसाईच्या फसवेगिरीला आणखी काहीजण बळी पडल्याची शक्यता आहे. दरम्यान, आपल्या सह्यांचा दुरुपयोग करून आपली फसवणूक केल्याची तक्रार हमीदार अभिषेक कुमार राय यांनी पोलिसांत केली होती. त्यानंतर या प्रकरणावर अधिक प्रकाश पडला.
हेही वाचा:पीडब्ल्यूडीतील भरती प्रक्रिया ‘रद्द’…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!