बाणावली लैंगिक अत्याचार प्रकरणः सहभागी सरकारी कर्मचारी सेवेतून निलंबित

विजय सरदेसाई यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: बाणावली बलात्कार प्रकरणात सहभाही असलेल्या सरकारी कर्मचारी राजेश माने (वय वर्षं, ३३) याला सेवेतून निलंबित केलं असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. गोवा फॉरवर्डचे नेते तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. बुधवारी गोवा विधानसभेत गोंधळाचं वातावरण पहायला मिळालं. मुख्यमंत्री आणि विजय सरदेसाईंमध्ये या प्रकरणावरून चांगलीच खडाजंगी झाली होती.

हेही वाचाः सोनू यादव मृत्यूप्रकरणी 5 जणांवर आरोप निश्चित करण्याचा आदेश जारी

गोवा फॉरवर्डचे नेते तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी आरोप केला, की बाणावली सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन आरोपींना वाचवण्यासाठी दक्षिणेतील एसपीवर अति प्रभावशाली व्यक्तीने दबाव आणला आहे.

हेही वाचाः किर्लोस्कर बंधूतही भाऊबंदकीचा वाद

बणावली येथे दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली कोलवा पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. ही घटना 25 जुलै रोजी पहाटे 3:30 वाजता ताज हॉटेल जवळ घडली. दोन्ही मुली वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रांसह बाहेर गेल्या होत्या. आरोपी पोलिसाच्या वेषात आले आणि यावेळी त्यांना पीडित मुलींच्या मित्रांवर हल्ला केला. त्यानंतर चारही आरोपींनी दोन्ही अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला. आसिफ हातेली, राजेश माने, गजानंद चिंचीणकर आणि नितीन याब्बल अशी अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत.

हा व्हिडिओ पहाः Video | RAPE CASE | मुख्यमंत्री-विजय सरदेसाईंमध्ये जोरदार खडाजंगी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!