शुक्रवारपासून मद्य विक्रीस बंदी?

निवडणुकांच्या क्षेत्रांत मद्य विक्रीस बंदी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: निवडणुका व पोटनिवडणुका होणाऱ्या पेडणे, वाळपई, डिचोली, कुंकळ्ळी, कुडचडे-काकोडा व काणकोण या सहा पालिका, पणजी महानगरपालिका, साखळी पालिकेचा प्रभाग नऊ, जिल्हा पंचायतीचा नावेली मतदारसंघ तसंच पंचायत क्षेत्रांत शुक्रवारी रात्री १२ ते शनिवारी रात्री १२ आणि रविवारी रात्री १२ ते सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत मद्य विक्रीस बंदी घालण्यात आलीये. वित्त खात्याचे अव्वर सचिव प्रणब भट यांनी बुधवारी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली.

बार अँड रेस्टॉरन्ट फक्त जेवणासाठी खुले

निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या हेतूने ज्या भागांत निवडणुका व पोटनिवडणुका होत आहेत, तेथे मद्यविक्री तसंच मद्याची वाहतूक करण्यास बंदी असेल. परवानाधारक बार मालकांना आपल्या बारबाहेर मद्य मिळणार नसल्याचा फलक लावावा लागेल. बार अँड रेस्टॉरन्ट जेवणासाठी खुले ठेवता येईल, असंही अधिसूचनेत म्हटलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!