फसवणूक, अपहरण, खंडणी प्रकरणी संशयिताचा खंडपीठात जामीन अर्ज

कॅनडाला नोकरीसाठी पाठवण्याच्या बहाण्याने तरुणांची आर्थिक फसवणूक प्रकरण; रॉबिन्सन डिसोझाने केल जामीन अर्ज

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी: कॅनडाला नोकरीसाठी पाठवण्याच्या बहाण्याने तरुणांची आर्थिक फसवणूक आणि अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी मागणाऱ्या टोळीतील रॉबिन्सन डिसोझा या संशयिताने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचाः सुळकर्णे डॉन बॉस्को कृषी महाविद्यालय मान्यता प्रकरणी १ सप्टेंबरला सुनावणी

अफगाणी नागरिक शपूर शरीफी याचं अपहरण केलं

अफगाणी नागरिक शपूर शरीफी याचं अपहरण केल्याप्रकरणी वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन वास्को पोलिसांनी पर्वरी येथील एका बंगल्यावर छापा टाकून शरिफी याची सुटका केली होती.

संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद

या प्रकरणी वास्को पोलिसांनी संशयित सुशील सिंग उर्फ ऋषभ (३५, हरयाणा), आलेक्स रिचर्डसन डिसोझा (२९, पेडणे), रॉबिन्सन डिसोझा (२३, पेडणे), आशिष त्रिपाठी (३०, गोरखपूर-उत्तर प्रदेश), रजत कल्याण (२३, हरयाणा), साहील कल्याण (२४, हरयाणा), प्रदीप कुमार (३२, हरयाणा), संजू सिंग (२८, हरयाणा), विजय (२६, हरयाणा), अनिल कुमार (३६, हरयाणा), अनुराग कुमार (१८, हरयाणा) व विशाल गोस्वामी (२०, हरयाणा) या संशयितांच्या विरोधात भादंसंच्या कलम ३६४(ए), ३४२ आणि ३६५ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली होती. तर सुटका करण्यात आलेल्या शरिफी बरोबर पोलिसांनी पंजाब येथील करमनप्रित सिंग या युवकाचे अपहरण केलेल्याची सुटका केली होती.

हेही वाचाः मडगावात बेकायदा कॅसिनोचा पर्दाफाश

या प्रकरणी पर्वरी पोलिस स्थानकात टोळी विरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्याप्रकरणी गुन्हा शाखेने संबंधित न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचाः ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा डायमंड लीगला हुकणार

रॉबिन्सन डिसोझाने केला जामीन अर्ज

दरम्यान वरील टोळीतील संशयित रॉबिन्सन डिसोझा याने  मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. तो फेटाळण्यात आल्यामुळे संशयिताने खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला आहे.  

हा व्हिडिओ पहाः Sattari | वाळपईच्या मामलेदार कार्यालयाला धडक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!