‘आप’ला उत्तर गोव्यात चालना मिळाली

बहुजन समाजाचे प्रमुख नेते उपेंद्र गांवकर यांचा 'आप' प्रवेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः शिरगाव मये मधील उत्तर गोव्याचे प्रमुख नेते आणि भंडारी समाजाचे नेते ,कार्यकर्ते उपेंद्र गांवकर यांनी आज आम आदमी पक्षात प्रवेश केला. गांवकर यांनी केजरीवाल सरकारमधील समाज कल्याण मंत्री एड. राजेंद्र पाल गौतम यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.

हेही वाचाः गुप्तांगात सोनं लपवून मुंबईत आणलं, तीन स्त्रियांना शिताफीने अटक, NCB ची धडक कारवाई

गावकर हे पेशाने नागरी कंत्राटदार

गावकर हे पेशाने नागरी कंत्राटदार आहेत. ते बहुजन समाजात त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत. २०१२ पासून ते गोमंतक भंडारी समाजाचे सरचिटणीस, गोमंतक बहुजन महासंघ (ओबीसी, एसटी, एससी) चे सचिव आहेत. गांवकर अनेक सामाजिक आणि धार्मिक संस्थांमध्येही सहभागी आहेत. शिरगाव येथील रहिवासी असणारे गावकर अशा वेळी ‘आप’मध्ये सामील झाले आहेत, जेव्हा पक्ष संपूर्ण गोव्यामध्ये आपला प्रभाव वाढवत आहे . आप आगामी निवडणुकांसाठी जोरदार प्रयत्न करत असून भाजप आणि इतर पक्ष त्यांच्या तोडीचे काम करण्यासाठी धडपडत आहे.

‘आप’ने समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्याचं काम केलं

गावकर म्हणाले की, आम आदमी पक्षाने विशेषतः समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्याचं काम केल्यानं ते प्रभावित झाले. युवकांना रोजगार मिळवून देण्याऱ्या आपच्या शिक्षण क्षेत्रातील कार्यामुळे ते प्रभावित झाले. नियोजित पद्धतीने देशातील नागरिकांना मोफत सेवा पुरवण्याच्या आप मॉडेलमुळेही ते प्रभावित झाले. महामारीच्या वेळी भाजप गोव्यात अपयशी ठरलं असल्याचं सांगून साथीच्या आजारांमुळे तसंच आर्थिक मंदीमुळे गोव्याला किती त्रास होत आहे याकडे लक्ष वेधलं. सावंत सरकारने या वेदना कमी करण्यासाठी कोणतेही पाऊल उचललं नाही. लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत आणि अर्थव्यवस्था मंदावली आहे. अधिक गंभीर गोष्ट ही आहे, की गोंयकारांना त्यांचं घर चालवणंही आता अशक्य झाले आहे.

हेही वाचाः पद्म पुरस्कारासाठी नामांकने मागवली

पुढे बोलताना गांवकर म्हणाले, ‘आप’ने कोविड दरम्यान चांगलं काम केलं आहे. आज भाजप सरकार फक्त एकट्या भाजपाचे नाही, तर गोंयकरांना लुबाडण्यासाठी भाजप आणि काँग्रेसची युती झाली आहे. आज फक्त ‘आप’ संपूर्ण देशात त्यांचा विरोधक म्हणून उभा आहे. मग तो पंजाब असो, उत्तराखंड किंवा गोवा. ‘आप’चं काम लोकांसाठी आणि विशेषतः ज्यांना सर्वात जास्त गरज आहे अशा बहुजन समाजासाठी महत्त्वाचं ठरतं. त्यांनी गोंयकारांची मनं जिंकली आहेत.

हेही वाचाः दरमहा 2200 रुपये भरा आणि 29 लाख मिळवा

‘आप’ हा एका आंदोलनातून वाढलेला पक्ष

समाज कल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम म्हणाले, ‘आप’ हा एका आंदोलनातून वाढलेला पक्ष असल्यानं आता भारताच्या राजकारणात क्रांती झाली आहे. राजकारणाबरोबरच ‘आप’ने सामान्य माणसाच्या जीवनातही क्रांती केली आहे. २४/७ वीज, मोफत २४/७ पाणी, आरोग्य सेवा आणि शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे. ‘आप’ने भ्रष्टाचार संपवून हे साध्य केलं आहे आणि म्हणूनच गोवेकर उत्सुकतेने ‘आप’मध्ये सामील होत आहेत.

‘आप’ मॉडेलने राज्यभरातील गोंयकरांची मनं जिंकली

‘आप’चे गोवा संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले, ‘आप’ मॉडेलने राज्यभरातील गोंयकरांची मनं जिंकली आहेत. उपेंद्र गांवकर सारख्या महत्त्वाच्या सामाजिक कार्यकर्त्यांसह अनेक गोंयकर दररोज पक्षात सामील होत आहेत. मला आज खूप आनंद झाला आहे, की उपेंद्र गांवकर केजरीवाल मॉडेल पाहून आमच्यात सामील झाले आहेत.

हेही वाचाः भाजप प्रदेशाध्यक्षांचं थिवी मतदारसंघात जोरदार स्वागत

गांवकरांचा पक्ष प्रवेश अशा वेळी झाला आहे, जेव्हा ‘आप’ राज्यात गोंयकरांसाठी एकमेव विश्वासार्ह पर्याय म्हणून वाढत आहे. आम आदमी पार्टी सत्तेवर आल्यावर २४/७ सतत वीजपुरवठा सुनिश्चित करताना, राज्यात ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देईल अशी घोषणा करण्यात आली. या धोरणामुळे गोव्याच्या ८७% लोकांना शून्य बिलं मिळतील, ज्याची एक आवृत्ती दिल्लीमध्ये आधीच सक्रिय आहे.

भाजप सरकारने सुरुवातीला उद्दाम आणि निंदक अशी घोषणा केली, की ते कधीही विनामूल्य सेवा देणार नाहीत. मात्र त्यांना दोन पावलं मागे यावं लागलं. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी १ सप्टेंबरपासून गोवेकारांसाठी मोफत पाणी देण्याची घोषणा केली. भाजप गोव्यातील घरांना मोफत पाणी देऊ शकत नाही. यामुळे सावंत यांच्या मोफत पाणी जुमल्यामागील वास्तव आणि त्यांच्या हर घर जल प्रचारामागील असत्य उघड झाले आहे.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | Accident | Sattari | टँकरची समोरुन पादचाऱ्याला जोरदार धडक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!