बहुजन समाज, दलितांसाठी न्याय मागणं अपराध असल्यास तो मी पुन्हा पुन्हा करेन

विरोधी पक्ष नेते दिगंबर कामतांचं प्रतिपादन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी नेहमीच बहुजन समाजाला स्वावलंबी बनवण्याची दूरदृष्टी ठेवली आणि त्यांना अग्रस्थान देण्याचा प्रयत्न केला. बहुजन आणि दलितांच्या हक्कांसाठी लढणं हे प्रत्येक नागरीकाचं कर्तव्य आहे. बहुजन समाज आणि दलितांसाठी न्याय मागणं हा भाजप सरकारात गुन्हा ठरत असेल, तर तो मी पुन्हा पुन्हा करेन, असं विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हटलं.

हेही वाचाः गिरी येथील बेपत्ता युवतीचा कळंगुट समुद्रकिनारी सापडला मृतदेह

भाऊसाहेब बांदोडकर जयंतीनिमित्त मिरामार येथे वाहिली श्रद्धांजली

आज गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांनी मिरामार येथे भाऊसाहेबांची समाधी आणि पणजी येथील पुतळ्याला हार घालून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर, मडगावच्या उपनगराध्यक्ष दिपाली सावळ, म्हापसाचे नगरसेवक सुधीर कांदोळकर, पणजीचे नगरसेवक ज्योएल आंद्राद, मडगावचे नगरसेवक दामोदर शिरोडकर, लता पेडणेकर, दामोदर वरक, सगुण नायक, सिद्धांत गडेकर तसंच इतर उपस्थित होते.

माझं ट्विटर अकाऊंट बंद केलं

आज भाऊसाहेबांच्या पुण्यतिथी दिनीच माझं ट्विटर अकाउंट बंद करण्यात आलं आहे. आमचे नेते राहुल गांधी यांनी लैगिंक अत्याचाराला बळी पडलेल्या एक नऊ वर्षाच्या दलित मुलीला न्याय मागणारं एक ट्विट केलं होतं आणि सदर मुलीच्या पालकांसोबत आपला फोटो सदर ट्विट बरोबर जोडला होता. त्या नंतर राहुल गांधी यांचं ट्विटर खातं बंद करण्यात आलं होतं. राहुल गांधीं यांनी व्यक्त केलेल्या भावनांना पाठिंबा देण्यासाठी मी ट्विट केल्यानंतर आज माझे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आलं आहे, असं कामत म्हणाले.

हेही वाचाः बारावीनंतर पुढं काय? हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्राविषयी जाणून घ्या, वाचा सविस्तर

हा भाजप सरकारात गुन्हा ठरला

बहुजन समाज, दलित यांना न्याय देण्यासाठी तसंच गोव्याची अस्मिता राखण्यासाठी आवाज उठवणं हा भाजप सरकारात गुन्हा ठरला आहे. आज भाऊसाहेबांच्या पुण्यतिथीला बहुजन समाजाच्या हक्कासाठी आणि गोव्याची अस्मिता सांभाळण्यासाठी लढण्याची मी शपथ घेतो, असं कामत म्हणाले. भाजप सरकार जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांच्या भावनांची सरकारला कदर नाही. महिलांचा सन्मान करणं हे सर्वांचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. दुर्देवाने सरकार त्यांचा आवाज दडपून टाकत आहे, असा आरोप कामतांनी केला.

हा व्हिडिओ पहाः To the Point | भूमीपुत्रच भाजपला सत्तेवरून खाली खेचणार

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!