‘ती’ चिमुकली अजूनही गोमेकॉत

रक्तात आढळलं इन्फेक्शन; अजून काही दिवस ठेवणार इस्पितळात

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: साखळीत सापडलेल्या त्या अर्भकाच्या रक्तात इन्फेक्शन आढळून आल्यानं तिला आणखी काही दिवस इस्पितळातच रहावं लागणारेय. डॉक्टरांचं विशेष पथक बाळावर उपचार करतंय.

हेही वाचाः ‘त्या’ चिमुकलीला मिळाली ‘अपना घर’ची सावली

रक्तात आढळलं इन्फेक्शन

साखळीत आढळलेल्या त्या चिमुकलीचे वाईट दिवस काही संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. जन्मताच मातेने त्यागल्यानंतर या एक दिवस वयाच्या मुलीला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होतं. तिची प्रकृतीही चांगली होती. केवळ वजन मात्र सामान्य प्रमाणापेक्षा कमी होतं. परंतु तिच्या रक्ताच्या चाचणीचा अहवाल डॉक्टरांना मिळाला असून त्यात इन्फेक्शन आढळून आलं असल्याची माहिती गोमेकॉच्या सूत्रांकडून देण्यात आलीये.

हेही पहाः Follow Up | Update | ‘त्या’ चिमुकलीला दत्तक घेण्यासाठी अनेकजण पुढे सरसावले 👇

अजून काही दिवस ठेवणार इस्पितळात

हे बालक बराच वेळ निर्जन अशा जागेवर एका पिशवीत कपड्याने गुंडाळलेल्या अवस्थेत होतं आणि खुल्या जागेवर जमिनीवर होतं. त्यामुळे त्याच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता होती. म्हणूनच त्याच्या सर्व चाचण्याही करण्यात आल्या. दरम्यान, तिची प्रकृती पूर्ण सुधारण्यासाठी आणखी काही दिवस जावे लागतील, अशी माहिती गोमेकॉतील डॉक्टरकडून देण्यात आली. पूर्णपणे ठीक झाल्यानंतरच तिला डिस्चार्ज देण्यात येणारेय. तिच्या देखभालीसाठी ‘अपना घर’मधील एक दाई गोमेकॉत नियुक्त करण्यात आलीये. गोमेकॉतील १३१ वॉर्ड मध्ये तिला ठेवण्यात आलंय. सध्या ती आयसीयूमध्ये असून डॉक्टर तिच्यावर उपचार करतायत.

हेही पहाः Breaking | जिवंत अर्भक आढळल्यानं खळबळ | साखळी 👇

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!