अबब! बिबट्याचा बछडा झाडावर चढला होता, वनविभागानं वाचवलं

भरवस्तीत घरासमोर असलेल्या झाडावर चढला बछडा

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

काणकोण : जंगली जनावरं मानवी वस्तीत शिरण्याच्या घटना नव्या नाहीत. अशीच एक घटना काणकोणमध्ये घडली. बिबट्याचा अवघ्या तीन महिन्यांचा बछडा भरवस्तीत शिरला. वस्तीत असलेल्या एका घरासमोरील झाडावर चढलेल्या बिबट्यानं एकच गोंधळ उडाला होता. काणकोणच्या पाटणेमध्ये ही घटना घडली. दरम्यान याची कल्पना तात्काळ वनविभागाला देण्यात आली.

बिबट्याचा बछडा झाडावर चढल्याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. प्रयत्नांची शर्थ करत वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बछड्याला झाडावरुन सुखरूप खाली उतरवलं आणि त्याची सुटका केली. इतकंच नाही, तर यानंतर या बछड्याला काणकोणच्या अभयारण्यातही सोडून देण्यात आलं. कर्तव्यदक्ष वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ बछड्याला जीवदान दिल्यानं सर्वच स्तरातून त्यांचं कौतुक होतंय.

पाहा फोटो –

झाडावर चढलेला बछडा

सुखरु खाली उतरवलं

हेही वाचा – अबब! राज्यात फक्त तीनच वाघ

अजूनही वर्क फ्रॉम होम करत असाल तर हे वाचाच!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!