भाजपच्या कोअर टीममध्ये बाबू कवळेकर, विश्वजीत, मॉविनची एन्ट्री

भाजप श्रेष्ठींच्या सल्ल्याने या नेमणूका केल्या असल्याची प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः भाजपच्या कोअर टीममध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी वर्णी लागल्यामुळे राजेंद्र आर्लेकरांना भाजपच्या कोअर टीममधून वगळण्यात आलं आहे. मात्र आर्लेकरांच्या जागी ३ महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश करण्यात आलाय. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे आणि मंत्री मॉविन गुदिन्होंचा आता भाजपच्या कोअर टीममध्ये समावेश करण्यात आलाय.

हेही वाचाः VIDEO VIRAL | नवरीची वरात पोचली पोलिस स्टेशनच्या दारात

या नेमणूका भाजप श्रेष्ठींच्या सल्ल्याने

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, मंत्री विश्वजीत राणे, मंत्री मॉविन गुदिन्हो यांना भाजप श्रेष्ठींच्या सल्ल्यानुसार स्थान देण्यात आल्याचं प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंनी सांगितलंय. या तिघांच्या त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील प्रभावामुळेच नाही तर संपुर्ण गोव्याच्या द्रृष्टीने विचार करुन यांचा भाजपच्या कोअर कमिटीत समावेश करण्यात आल्याचंही तानावडेंनी सांगितलं.

हेही वाचाः Video | जीव धोक्यात घातला, पण वीज कर्मचाऱ्यानं कर्तव्य बजावलं!

निवडणूकांच्या तोंडावर तिघांनाही मिळेल अधीक बळ

उपमुख्यमंत्री कवळेकर, मंत्री राणे आणि गुदिन्हो यांचा भाजपच्या कोअर कमिटीत समावेश झाल्याने या तिघांना भाजपच्या निवडणूक प्रक्रियांमध्ये मोठा वाटा घेण्याची संधी उपलब्ध झालीये. भाजपचे उमेदवार ठरवताना कोअर कमिटीचा निर्णय वा मताला प्रधान्य दिलं जातं. या तिघांच्या समावेशामुळे भाजपमधीलच अनेक नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!