बाबा रामदेव पुन्हा ‘पळाले’…थेट लसीकरणाकडं वळले !

डॉक्टरांमध्ये बाबांना आता दिसला 'देवदूत'

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : या देशातले साधु-सन्यासी, योगपुरूष, बाबा-महाराज हे आपल्या शब्दांविषयी पक्के असतात, असं भारतीय संस्कृती सांगते. मात्र रामदेव बाबा याला अपवाद ठरलेत. आंदोलनाच्या मैदानातुन पळ काढणा-या रामदेव बाबांना आपण पाहिलंच आहे. पण ते आपल्या भूमिकेपासूनही पळ काढत आहेत. अॅलोपॅथी डाॅक्टरांबाबत जाहीरपणे घेतलेल्या भूमिकेपासूनही त्यांनी पळ काढला असून आता तर ते लसही घ्यायला तयार झालेत.

रामलीला मैदानात सुरू असलेल्या आंदोलनातुन वेश बदलुन त्यांनी पळ काढला होता. मध्यंतरी त्यांचं काळया पैशाबाबतचं विधानं खूप चर्चेत होतं. 30 रूपये दरानं पेटोल मिळेल, अशीही मुक्ताफळं त्यांनी उधळली होती. कोरोनाच्या महामारीत त्यांचं उत्पादन असलेलं कोरोनील हे औषध वादात आहे. नेपाळनं यावर नुकतीच बंदी घातलीय.

सध्या ते जोरदार चर्चेत होते ते अॅलोपॅथी डाॅक्टरांबाबत केलेल्या विधानामुळं. यासंदर्भात न्यायालयात केसही सुरू आहे. दरम्यान, या भूमिकेपासूनही त्यांनी आता पळ काढलाय. डॉक्टर देवदूत असल्याचंही ते म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जूनपासून सर्वांना मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली. या निर्णयाचं स्वागत करत, सर्वांनी कोरोना लस घ्यायला हवी, असंही ते म्हणाले. त्यांनी चक्क आपणही लस घेणार असल्याचं मिडीयासमोर सांगितलंय. उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, की कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन योग आणि आयुर्वेदाच्या डबल प्रोटेक्शनचा लाभ घ्या. यामुळे कोरोनाविरोधातील लढ्यात एकाही व्यक्तीचा मृत्यू होणार नाही. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!