बी. व्ही. नागरत्ना यांना पहिल्या सरन्यायाधीश होण्याची संधी

सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी नऊ नव्या नायाधीशांची नियुक्ती

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याद्वारे नियुक्ती पत्रांवर स्वाक्षरी करण्यासोबतच सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी नऊ नव्या नायाधीशांची नियुक्ती करण्यात आली. यात तीन महिलांचाही समावेश आहे. या नियुक्तीमुळे न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांना देशाच्या पहिल्या सरन्यायाधीश होण्याची संधी मिळणार आहे. मात्र त्यासाठी देशाला सप्टेंबर २०२७ उजाडण्याची वाट पाहावी लागणार आहे. न्यायमूर्ती नागरत्ना २०२७ साली सरन्यायाधीश पदावर विराजमान झाल्या तरी त्यांचा कार्यकाळ केवळ एका महिन्याचा राहील.

हेही वाचाः बाबूश यांच्या चालीची मडकईकरांकडून पुनरावृत्ती

२०२७ नंतर पहिल्या महिला सरन्यायाधीश होण्याची संधी

३० ऑक्टोबर १९६२ रोजी जन्मलेल्या न्यायमूर्ती नागरत्ना या माजी सरन्यायाधीश ई. एस. व्यंकटरामय्या यांच्या कन्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून त्यांचा कार्यकाळ २९ ऑक्टोबर २०२७ पर्यंत राहील. २३ सप्टेंबर २०२७ नंतर पहिल्या महिला सरन्यायाधीश म्हणून एका महिन्यासाठी त्या जबाबदारी हाताळू शकतील.

सर्वोच्च न्यायालयात चार महिला न्यायाधीश

न्या. नागरत्ना यांच्याखेरीज तेलंगण उच्च न्यायालयाच्या न्या. हिमा कोहली आणि गुजरात उच्च न्यायालयामधील न्या. बेला त्रिवेदी या महिला न्यायाधीशांचाही यात समावेश आहे. यामुळे आता सर्वोच्च न्यायालयातील एकूण महिला न्यायाधीशांची संख्या ४ वर पोहचली आहे.

हा व्हिडिओ पहाः CRIME | DEATH | पोलिस तपासात सहकार्य करण्यास टाळाटाळ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!