भाजप आमदार, मंत्र्यांची शाळा सुरू

आमदार, मंत्र्यांची वैयक्तीक भेट; उमेदवारीसाठीचे रिपोर्ट कार्ड तयार करणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी.एल.संतोष तसंच गोवा प्रभारी सी.टी.रवी यांच्याकडून भाजपचे आमदार, मंत्र्यांची शाळा सुरू केली आहे. बुधवारी रात्री आमदारांची भेट घेतल्यानंतर गुरूवारी सकाळी मंत्र्यांची भेट घेण्यास सुरुवात केलीए. आत्तापर्यंत आमदार आणि मंत्री म्हणून केलेले काम आणि पुढे करावयाचे काम याचा आढावा या बैठकीत घेण्यात आल्याचं कळतंय.

हेही वाचाः मी बाबू आजगावकरांचा समर्थक नाही

गोव्यात आगामी विधानसभा निवडणूका फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहेत. फक्त आठ महिने बाकी राहीलेत. देशातील एकूण पाच राज्यांत या निवडणूका होणार असल्याने या अनुषंगाने या राज्यांतील संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यासाठी संघटन सरचिटणीस बी.एल.संतोष या सर्व राज्यांचा दौरा करत आहेत. बुधवारी संध्याकाळी ते गोव्यात दाखल झाले. गोव्याचे प्रभारी सी.टी. रवी हे देखील संध्याकाळी उशिरा गोव्यात पोहचले.

हेही वाचाः वेदांताकडून जीएमसीत 100 अद्ययावत बेड्सचं वितरण

आमदार, मंत्र्यांची वैयक्तीक भेट

यावेळी बी.एल.संतोष यांनी भाजपच्या सर्व आमदार, मंत्र्यांना वैयक्तीक भेट दिलीए. एकंदरीत राज्यातील राजकीय परिस्थिती, मतदारसंघातील वातावरण, सरकारचं काम, पक्षाचं काम तसंच आगामी निवडणूकीसंबंधीची त्यांची प्रतिक्रिया आणि तयारी याबाबतचा आढावा या बैठकीत घेण्यात येतोय. सरकार, पक्ष किंवा अन्य काही तक्रारी असल्यास त्यासंबंधीही माहिती जाणून घेतली जात असल्याचं कळतंय.

हेही वाचाः एसपीसीए अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती नूतन सरदेसाई

उमेदवारीसाठीचे रिपोर्ट कार्ड तयार करणार

आगामी विधानसभा निवडणूकीत कुणाला उमेदवारी द्यायची यासंबंधीचे रिपोर्ट कार्ड तयार केलं जाणार आहे. प्रदेश भाजपची कोअर समिती, मुख्यमंत्री यांच्याकडून हे रिपोर्ट कार्ड तयार केलं जाईल. बी.एल.संतोष हे आपल्या बैठकीनंतर प्रत्येकाच्या कामगिरीचा एक अहवाल तयार करणार आहेत. या तिन्ही अहवाल एकत्र करून त्यानंतरच उमेदवारीबाबतचा निर्णय घेतला जाईल. परफोरर्मिंग आमदार, मंत्र्यांना प्राधान्य मिळणार असल्याचीही माहिती समोर आलीए.

हेही वाचाः प्रायोगिक रंगभूमीचे आधारवड अरुण काकडे यांचं निधन

कोअर समितीची बैठक

आमदार, मंत्र्यांच्या बैठकीनंतर बी.एल.संतोष आणि सी.टी. रवी हे वरिष्ठ पदाधिकारी यांची भेट घेणार आहेत. यानंतर भाजप कोअर समितीकडे त्यांची बैठक होणार आहे. सरकारात राहून पक्ष आणि सरकारला अडचणीत आणण्याचं काम काही आमदार, मंत्री करत आहेत. अशा लोकांची माहिती श्रेष्ठींनी आपल्याकडे ठेवली आहे. या बैठकीत अशा आमदार, मंत्र्यांना संतोषजी यांच्याकडून ताकिद दिली जाणार असल्याची माहितीही सुत्रांकडून कळतं. एकूणच आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने या बैठकीनंतर प्रत्येक भाजप आमदार, मंत्र्यांना आपल्या राजकीय भवितव्याचे संकेत मिळणार असल्याची खबर आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!