‘आजादी का अमृत महोत्सव’चा साबरमतीत उद्या शुभारंभ

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी: भारतीय स्वातंत्र्याचे पंच्याहत्तरावे वर्ष साजरे करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते १२ मार्च २०२१ रोजी अहमदाबाद येथील साबरमती आश्रमात संबंधित राज्य आणि संघप्रदेशात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘आजादी का अमृत महोत्सव’ या विशेष कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे.
गोव्यातही कार्यक्रमाचं आयोजन
गोव्यातही पणजीतील आझाद मैदानावर आयोजित कार्यक्रमातून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे इतर मान्यवरांसह या महोत्सवाच्या शुभारंभ सोहळ्यात व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी होतील. उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर मडगाव येथील लोहिया मैदानावरील आयोजित कार्यक्रमात व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी होणार आहेत.
विविध कार्यक्रमांचं आयोजन
‘आजादी का अमृत महोत्सव’ यानिमित्ताने राज्यात सायकल मिरवणूक, प्रश्नमंजूषा, वादविवाद, एकांकिका, गायन, पोस्टर मेकिंग आदी स्पर्धा, देशभक्तीपर विषयांवरील चर्चासत्रे अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. असे माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.