कोरोना निवारणासाठी आता ‘आयुष’चं मनुष्यबळ !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोरोनाचा स्फोट आणि वाढत्या रुग्णसंख्येचा आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेता, देशातलं आयुष मंत्रालय करतंय तरी काय? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. मात्र यासंदर्भात आयुष्य मंत्रालयाच्या आवाहनाला राज्य सरकारांनी काहीच प्रतिसाद दिला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी यासंदर्भात नुकतेच राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. आयुष मंत्रालयांतर्गत देशभरात 733 प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. कोरोना निवारणासाठी या सर्व मनुष्यबळाचा चांगल्या पद्धतीनं उपयोग होऊ शकतो. कमी लक्षणं असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी आयुष डॉक्टरांची नियुक्ती करावी, त्यांना योग्य ठिकाणी जागा द्यावी, अशा आशयाचं आवाहन सर्व राज्यांना गेल्या एप्रिलमध्ये करण्यात आलं होतं. परंतु कोणत्याही राज्यानं प्रतिसाद दिला नाही. अगदी गोव्यातही योग्य प्रतिसाद मिळाला नाही. अशा प्रकारची सेवा देण्यासाठी तब्बल 35 डॉक्टर्स इथं तयार होते. यामुळं रुग्णालये आणि मनुष्यबळ यांच्यावरचा ताण कमी झाला असता. दरम्यान, सध्याची स्थिती पाहता तातडीनं जिल्हा आयुष अधिकाऱ्याला कोरोना निवारण प्रक्रीयेत समाविष्ठ करून आयुष खात्यांतर्गत असलेलं मनुष्यबळ यासाठी तातडीनं वापरण्यात यावं, अशा सुचना आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी दिलेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!