राज्यातील प्रत्येक इस्पितळात आयुष विभाग स्थापन करणार!

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयुर्वेदाला पुन्हा चांगले दिवस आणले आहेत. राज्यातील प्रत्येक इस्पितळात आयुष विभाग स्थापन करण्यात येणार आहे. जागतिक आयुर्वेद काँग्रेसचा गोमंतकीयांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. पणजी येथील नवव्या आयुर्वेद काँग्रेस परिषदेच्या उद् घाटनप्रसंगी ते बोलत होते.
हेही वाचाःपणजीत नवव्या आयुर्वेद काँग्रेस परिषदेला आजपासून प्रारंभ…

परिषदेला ६० देशांतील ५ हजार प्रतिनिधींनीची नोंदणी
नवव्या आयुर्वेद काँग्रेस परिषदेला गुरुवार, दि. ८ डिसेंबरपासून प्रारंभ हाेत आहे. ११ डिसेंबरपर्यंत चार दिवस ही परिषद चालणार आहे. ११ डिसेंबर रोजी सायं. ४.३० वा. कांपाल मैदानावर आयुर्वेद परिषदचा समाराेप होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेला आतापर्यंत ६० देशांतील ५ हजार प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. ही परिषद कला अकादमी तसेच कांपाल मैदानावर भरवण्यात आली आहे. यात आयुर्वेदातील अनेक जागतिक तज्ज्ञ सहभागी झाले आहेत.
हेही वाचाःमडगाव फेस्तनिमित्त नगराध्यक्षांनी घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय…
9th World Ayurveda Congress and Arogya Expo 2022 inaugurated in Goa
PM @narendramodi to attend the valedictory function of #WAC2022 on 11 December
Read more: https://t.co/6dU5j6OIxV pic.twitter.com/CMM9Wua3tX
— PIB India (@PIB_India) December 8, 2022