डिचोली येथे तीन कार्यालयांमध्ये चोरीचा प्रयत्न…

नॅशनल इन्शुरन्स पॉलिसी ऑफिसमधील ५० हजार केले लंपास

विनायक सामंत | प्रतिनिधी

डिचोली : डिचोलीतील टाउन सेंटर इमारतीत चोरांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. डिचोलीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या टाउन सेंटर इमारतीमधील वाहतूक कार्यालय, लेबर इन्स्पेक्टर ऑफिस आणि नॅशनल इन्शुरन्स पॉलिसी ऑफिसमध्ये चोरांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडल्याचं समजतंय.
हेही वाचाःGoa Accident : चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने कुंडई येथे अपघात…

पोलिसांकडून पुढील तपास सुरु

टाउन सेंटर इमारतीमधील तिन्ही ऑफिसच्या दाराच्या कड्या आणि लॉक तोडून चोरांनी सराईतपणे चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र नॅशनल इन्शुरन्स पॉलिसी ऑफिसमधील ५० हजार वगळता त्यांच्या हाती काही लागले नाही. या चोरीचा तपास डिचोली पोलीस ठाण्याचे निरिक्षक सुरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूए.
हेही वाचाःचुकीच्या मीटर रिडिंगमुळे भरमसाट पाणी बिल…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!