४ जून रोजी झाला पावलूच्या घरावर हल्ला

हल्लात पावलूचा भाऊ जखमी; पोलिसांत तक्रार दाखल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः पोलिसांच्या यादीत असलेल्या कुख्यात गुंड पावलूच्या ताळगावातील घराजवळच त्यावार दुसऱ्या गटानं तलवारींनी हल्ला केला. पण पावलू घरामागच्या शेतातून पळ काढण्यात यशस्वी ठरला. त्याचा एक भाऊ या हल्ल्यात जखमी झाला. या प्रकरणी पावलूच्या भावाने पणजी पोलिसांत तक्रार दाखल केलीये. हे प्रकरण घडलंय. जूनला. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केलाय. मात्र त्यावेळी हे प्रकरण उघडकीस आलं नव्हतं.

हेही वाचाः तब्बल ६४ पोलीस अधिकाऱ्यांची पदे रिकामी

अपेक्षित तपास पुढे सरकला नाही

लाल-काला-पिला जुगार चालवणाऱ्या एका व्यक्तीचा या हल्ल्यात हात असल्याची चर्चा तिसवाडीत आहे. पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण खरा हल्ला हा पावलूवर झाला होता, अशी माहिती समोर येतेय. हे गँगवॉरचं प्रकरण जरी असली तरी त्या अनुषांगाने अपेक्षित असणारा तपास पुढे सरकला नसल्याचं बोललं जातंय.

हेही वाचाः केकमध्ये गांजाः आणखी एका ड्रग्स तस्कराला अटक

पावलूवर झालेला हल्ला फसला

या हल्ल्यात ऍड. आयरिश रॉड्रिग्स यांच्यावर हल्ला करणाऱ्या गँगच्या काही गुंडाचाही समावेश होते. पावलूवर झालेला हल्ला फसला. पावलू आपल्यावरील हल्ल्याचा बदला घेण्याची शक्यता असल्यामुळे हल्लेखोर भूमिगत झालेत. ताळगाव, पणजी, मेरशी या भागांमध्ये दहशत असलेल्या गुंडांच्या एका टोळीतील काहीजणांचा या हल्लेखोरांमध्ये समावेश आहे.

हेही वाचाः पचनशक्ती, डोळ्यांची नजर मजबूत होण्यासाठी नियमित करा ‘ही’ 5 साधीसोपी योगासने!

तिसवाडीमध्ये घटना गेले काही दिवस चर्चेत

हल्लेखोरांनी तलवारी, चॉपरचा वापर केला. पण हल्लेखोरांना चकवा देऊ पावलू घराच्या मागच्या बाजूने शेतांमधून पसाल झाल्यानं बचावला. तिसवाडीमध्ये ही घटना गेले काही दिवस चर्चेत आहे. गेली तीन चार वर्षं पावलूच्या कारवाया थंडावल्या होत्या. तिसवाडीत एकमेकांच्या विरोधात वावरणाऱ्या गुंडांच्या पाच ते सहा गँग सक्रिय असल्यामुळे त्यांच्यात पुन्हा पुन्हा गँगवॉर होण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या वर्षी सांताक्रुझमध्ये इम्रान बेपारीच्या घरावर हल्ला झाला होता, त्यानंतर यंदा ४ जूनला पावलूच्या घरावर हल्ला झालाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!