मुळगाव येथे ऑनड्यूटी पोलिस कॉन्स्टेबलवर प्राणघातक हल्ला

शुक्रवारी दुपारची घटना; जिवे मारण्याची दिली धमकी; संशयित फरार

विनायक सामंत | प्रतिनिधी

डिचोलीः एका ऑनड्यूटी पोलीस कॉन्स्टेबलवर भर दुपारी शिरोडवाडी मुळगाव येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला. तसंच त्याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. एका पोलिस कॉन्स्टेबलच्या बाबतीत असा प्रकार घडल्याने कायदा आणि व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

हेही वाचाः संघाने गोव्यात दुतोंडीपणा कशासाठी धारण केला?

शुक्रवारी दुपारची घटना

ही घटना शुक्रवारी दुपारी १२.३० च्या दरम्यान घडली. डिचोली पोलिस स्थानकातील पोलिस कॉन्स्टेबल प्रविण नास्नोळकर हे कामानिमित्त जात असताना संशयित आरोपी पवन कळंगुटकर (मुळगाव) यांने आपली दुचाकी रस्त्याच्या मधोमध आडवी घालून कॉन्स्टेबल नास्नोळकर यांचा रस्ता अडवला आणि त्यांच्या डोळ्यात पेपर स्प्रे मारून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आणि फरार झाला.

हेही वाचाः गोव्याच्या ‘शुगर’ला ‘सर्फिंग’मध्ये रौप्यपदक

गुरुवारी संशयिताला पकडलं होतं पोलिसांनी

गुरुवारी मध्यरात्री पोलिस गस्त घालताना संशयित पवन कळंगुटकर त्याच्या एका साथीदारासोबत संशयातरित्या फिरताना सापडला. त्याला रात्री पोलीस चौकीवर चौकशीसाठी नेलं असता पोलीस चौकीकडे पोहोचता पोहोचता त्याने धुम ठोकली. त्यावेळी त्याचा गाडीचा नंबर नोट करून त्याला सकाळी पोलिस चौकीवर बोलवण्यात आलं होतं. हाच राग मनात धरून त्याने दुपारी पोलिस कॉन्स्टेबल नास्नोळकरांवर हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.

हेही वाचाः गेल्या 7 महिन्यात राज्यात 17 बलात्कार प्रकरणांची नोंद

संशयित फरार

सध्या संशयित फरार असून त्याचावर डिचोली पोलीस ठाण्यात भा.दं.सं. ३४१,३२६,३३२,३५३,५०६ (२), ३५२ याखाली गुन्हा नोंद केला आहे. पोलीस उपनिरीक्षक करिश्मा परूळेकर पुढील तपास करत आहेत.

हा व्हिडिओ पहाः THEFT | संशयित युवकाला अटक, मुद्देमाल हस्तगत

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!