‘एटीएस’ची पणजीत शहरी मार्च

28 रोजी आयोजन; ९० एटीएस कमांडो सहभागी होणार

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी: गोवा पोलिसाच्या दहशतवाद विरोधी पथकाची (एटीएस) ताकद प्रदर्शित करण्यासाठी पहिल्यांदाच शहरी मार्चचं आयोजन करण्यात आलं आहे. ही शहरी मार्च शनिवार २८ रोजी सकाळी पणजीत आयोजित करण्यात आली आहे.

हेही वाचाः ‘खोला मिरची’चा तडका आता टपालद्वारे सर्वदूर!

२८ रोजी पणजी होणार मार्च

गोवा एटीएसची शहरी मार्च १० किमी २८ रोजी पणजी होणार आहे. शहरी मार्च सकाळी ९ वाजता आल्तिन्हो येथील गोवा राखीव पोलीस कॅप पासून सुरु होणार आहे. त्यानंतर सातिनेझ जंक्शन, काकुलो मॅल, टोंका जंक्शन, मिरामार सर्कल, कला अकादमी होऊन आजाद मैदानावर संपणार आहे.

९० एटीएस कमांडो सहभागी होणार

या वेळी ९० एटीएस कमांडो सहभागी होणार आहे. या वेळी एटीएस कमांडो रायफल आणि रणनीतिक उपकरणांसह १० किलोमीटरचा शहरी  मार्च काढण्यार आहे.

हा व्हिडिओ पहाः Taxi Issue | फोंड्यातील टॅक्सी व्यावसायिकांना ताम्हणकरांचा पाठिंबा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!