एटीएमची चोरी करणाऱ्या संशयिताला अटक

बोर्डे-डिचोलीतील घटना; मंगळवारी केला चोरीचा प्रयत्न

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोली: राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. चोरी, बलात्कार, हत्या, मारहाण अशा प्रकारची प्रकरणे वर्षाच्या सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. यामुळे गोव्याला मिनी बिहारचं स्वरूप येऊ लागलंय. गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे गोंयकार दिवसाढवळ्या मोकळेपणाने फिरण्यास घाबरत आहेत. डिचोलीत चक्क एटीएम मशीनमधून पैसे चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

हेही वाचाः थकीत वेतन, बोनससाठी संजीवनीच्या कामगारांची निदर्शने

नक्की काय झालं?

बोर्डे – डिचोली येथील युनियन बँक ऑफ इंडिया येथील एटीएमला मेटल लावून पैसे चोरण्याचा मुस्लिमवाडा डिचोली येथील मेहबूब हैदर अली शेख (२७) याला डिचोली प्रयत्न करणाच्या पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतलं.

मंगळवारची घटना

मंगळवारी सदर मशीन लावलं होतं. त्यानंतर बुधवारी हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात उघडकीस आला. त्यानंतर त्यानुसार तपास करून पोलीस निरीक्षक महेश गडेकर व टीमने संशयितास अटक केली.

हेही वाचाः जीएसटी : ऑगस्टमध्ये गोव्यातून २८५ कोटी जमा

या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

हा व्हिडिओ पहाः CM | FREE WATER | सर्वांना मोफत पाणी पुरवणारं गोवा पहिलं राज्य!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!