पर्वरी ATM चोरी प्रकरण : तिघांना दिल्लीतून पकडलं, मुख्य आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला

मोठ्या शिताफीनं मुख्य आरोपीला पकडलं

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी : पर्वरी एटीएम चोरीप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.. याप्रकरणी मुख्य आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडलाय. तिन्ही चोरांना पकडल्यानंतर मुख्य आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी पळ काढणाऱ्या चोरावर गोळी झाडली. पायावर गोळी झाडत पोलिसांनी मुख्य चोरट्याच्याही मुसक्या आवळ्यात. हा सर्व प्रकार दिल्लीत घडलाय. यावेळी पोलिसांनी साडेतीन लाखांची रोकड हस्तगत केली.

मुख्य आरोपीचं नाव रुस्तम सुहाग आहे. इतर दोघांपैकी एकाच सफीकुल मुल्ला असं असून दुसऱ्या चोराचं नाव मोहम्मद सफी असं आहे. सुकूर पर्वरीतील युनियन बँकेचं एटीएम उखडून चोरट्यांनी त्यातील एकोणीस लाख 38 हजाराची रोकड लंपास केली होती. याप्रकरणी दिल्लीतील सीमापुरी झोपडपट्टीतून चोरट्यांना ताब्यात घेण्यात आलंय. रविवारी घडलेल्या या घटनेनंतर एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

असे सापडले चोरटे…

पोलिसांनी रविवारी पर्वरी परिसरात रेन्ट अ कॅब आणि बाईट मालकांची माहिती मिळवली होती. त्यानंतर त्यांची चौकशी केली. यावेळी संशयितांनी कळंगुटहून कॅब रेन्ट केली होती. शनिवारी त्यांनी कॅब रेन्ट केली आणि रविवारी सकाळी परत आणून दिली, असं चौकशीतून समोर आलं. यानंतर पोलिसांनी संशयितांनी राज्याच्या सीमा ओलांडली असल्याचं ध्यानात आलं. संशयित बंगळुरुत असल्याचाही पोलिसांना संशय होता. पोलिस सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होते. त्यानंतर दिल्लीतील सीमापुरी झोपडपट्टीमध्ये संशयित असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.

दिल्ली पोलिसांच्या मदतीने गोवा पोलिसांनी कारवाई केली. यावेळी मुख्य आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी चोरट्याच्या पायांवर गोळीबर केला. यात त्याचे दोन्ही पाय जखमी झाले. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेले संशयित बांगलादेशी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

एटीएम सुरक्षेचं काय?

पर्वरीती एटीएम चोरीच्या घटनेनंतर एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. राज्यात याआधीही एटीएम चोरीच्या घडना घडलेल्या आहेत. वारंवार एटीएमच्या सुरक्षेबाबत पोलिसांकडून सूचना केल्या जातात. मात्र त्याकडे गांभीर्यानं पाहिलं जात नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे चोरांना मोकळं रान मिळत असल्याचं बोललं जातंय.

हेही वाचा –

1ली ते 8वीच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात

केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, राज्यसरकारी कर्मचाऱ्यांचं काय?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!