MISSING | आपण याला पाहिलंत का? बेपत्ता मुलाचा शोध घेण्याचं आवाहन

अथर्व मनेश नाईक मंगळवार (24 ऑगस्ट) सकाळपासून बेपत्ता

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः उत्तर गोव्याच्या फोंडा तालुक्यातील कवळे गावातील मनेश नाईक यांचा मुलगा मंगळवारी (24 ऑगस्ट) सकाळपासून बेपत्ता झाला आहे. मनेश नाईक आणि कुटुंबिय जिवाचं रान करून मुलाचा शोध घेत आहेत.

हेही वाचाः ‘अभंग गंगेच्या काठावर’ मैफलीला रसिकांकडून भरभरून दाद

मंगळवारी सकाळपासून बेपत्ता

मनेश नाईक यांचा मुलगा अथर्व नाईक हा मंगळवारी सकाळपासून त्याच्या घरातून बेपत्ता असल्यानं या कुटुंबावर आकांत आला आहे. त्याला शेवटचं मंगळवारी सकाळी मडगाव येथील कदंब बसस्थानकावर पाहण्यात आलं असल्याचं समजतंय. यानंतर त्याचा ठाव ठिकाणा लागत नसल्यानं त्याचे कुटुंबीय प्रचंड तणावात आले आहेत.

बेपत्ता मुलाचा शोध घेण्याचं आवाहन

अथर्व जेव्हा बराच वेळ घरी परतला नाही, तेव्हा त्याचे वडील तसंच कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यासाठी उपलब्ध सर्व माध्यमांचा उपयोग केला आहे. अथर्वचा पत्ता लवकरात लवकर लागावा यासाठी त्याचे वडील खूप प्रयत्न करत आहेत. तरी त्याच्याबद्दल काही माहिती मिळाली तर कृपया 9922504763 या संपर्क क्रमांकावर फोन करून कळविण्याची विनंती करण्यात आली आहे.

हेही वाचाः तरूणांनो सावधान! नोकरभरतीबाबत सतर्क रहा

असं एकाएकी अथर्वच्या गायब होण्यामागचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. तो जिथे कुठे असावा तिथे सुखरूप असावा, अशी प्रार्थना त्याचे कुटुंबिय करत आहेत.

हा व्हिडिओ पहाः Crime | Follow Up | Major Development | सिद्धी नाईकच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वाची अपडेट

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!