अटल सेतू वाहतूकीसाठी बंद होणार?

मोठ्या प्रमाणात अटल सेतूवर अपघात

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : मांडवीवरील अटल सेतू काही दिवस वाहतूकीसाठी बंद होऊ शकतो. पुलावर सतत घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभुमीर खुद्द सरकारमधील एका मंत्र्याने पूल काही दिवसांसाठी वाहतूकीसाठी बंद ठेऊन आवश्यक डागडुजी करण्याची मागणी केलीय.
हेही वाचाःबारावीचा निकाल जाहीर ; मुलींनी मारली बाजी…

मोठ्या प्रमाणात अटल सेतूवर अपघात

पणजी मांडवीवरील अटल सेतूवर होणाऱ्या अपघातांच सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीए. पुलावरील भले मोठे खड्डे, पुलाचं फॉल्टी बांधकाम यामुळे मोठ्या प्रमाणात तिथं अपघात घडत आहेत. आता तर खुद्द सरकारमधील मंत्री रोहन खंवटे यांनी हा पुल काही दिवस वाहतूकीसाठी बंद ठेऊन इथं अपघात का घडतात, पुलाच्या फॉल्टी डिझायनमध्ये काही सुधारणा करणं अवश्यक आहे का याचा अभ्यास करुन त्या तात्काळ कराव्यात अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. स्वता आपण या पुलावरुन जाताना अपघातातून बालंबाल बचावलो अशी माहितीही खंवटे यांनी दिली.
हेही वाचाःसरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच ‘ही’ योजना…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!