…त्यावेळी वाजपेयीजी बैलगाडीतून पार्लमेंटला गेले होते !

1973 ला झाली होती 7 पैशांची पेट्रोल दरवाढ !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : इंधन दरवाढ हा सध्या देशभरात चर्चेचा विषय. सत्तेवर कोणीही असलं तरी या दरवाढीनंतर आंदोलनं करणं, हा विरोधी पक्षाचा पायंडा. या आंदोलनात कल्पकता असतेच. अगदी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचीही आंदोलनं याबाबतीत खूप गाजली. पण या आंदोलनातली कल्पकता ही आजची नाही. 1973 साली पेट्रोल केवळ 7 पैशांनी वाढल्यानंतर दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही अभिनव आंदोलन केलं होतं. त्यावेळी ते चक्क बैलगाडीतून पार्लमेंटला गेले होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय..

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!