मोरजीत ९० वर्षीय महिलेले घेतली कोरोना लस

एकूण ५०६ नागरिकांचं लसीकरण; तरुणांचा मोठा सहभाग

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः मोरजी पंचायत क्षेत्रातील टीका उत्सवात एकूण ५०६ नागरिकांनी लस घेतली असून त्यात ९० वर्षीय मारिया परेरा यांचा समावेश आहे. यात तरुणांचा मोठा सहभाग होता.केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य खात्यातर्फे राज्यात १०० टक्के नागरिकांनी कोरोना लस घ्यावी यासाठी टीका उत्सव आयोजित केला आहे.

मोरजी पंचायत क्षेत्रातील पंच सदस्यांनी केली जनजागृती

मोरजीतील श्री कळस देव मांगर सभागृहात आयोजित केलेल्या टीका उत्सवाची जनजागृती मोरजी पंचायत क्षेत्रातील एकूण ९ पंच सदस्य, सरपंच वैशाली शेटगावकर, उपसरपंच अमित शेटगावकर, पंच मुकेश गडेकर, विलास मोरजे, पवन मोरजे, प्रकाश शिरोडकर, तुषार शेटगावकर, संपदा शेटगावकर, सुप्रिया पोके, मोरजी जिल्हापंचायत सदस्य सतीश शेटगावकर, माजी सरपंच धनंजय शेटगावकर, मंदार पोके, महिला मोर्चा भाजपाचा अध्यक्षा नयनी शेटगावकर आदींनी केली.

एकूण ५०६ नागरिकांनी घेतली लस

या टीका उत्सवाचा एकूण ५०६ नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी डॉक्टर मनस्वी आळवे, सदानंद शेटगावकर, कुशाजी नाईक, रंजिता शेटगावकर, प्राची कलशावकर या आरोग्य कर्मचाऱ्यांनी बरीच मेहनत घेतली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!