गुळे येथे एकाच जागी दोन म्हालवाहू ट्रक कलंडले

टीचर्स ब्रेंड दारुच्या बाटल्यांनी भरलेला ट्रक शुक्रवारी पहाटे कलंडला

संजय कोमरपंत | प्रतिनिधी

काणकोणः मडगावहुन कारवारच्या दिशेने जाणारे दोन म्हालवाहू ट्रक गुळे येथे कलंडले. एक ट्रक गुरुवारी पहाटे, तर दूसरा शुक्रवारी पहाटे कलंडला. गुरुवारी पहाटे कलंडलेल्या ट्रकमध्ये लाल माती होती, तर शुक्रवारी पहाटे कलंडलेल्या ट्रकमध्ये टीचर्स ब्रेंड दारूच्या बाटल्यांनी भरलेले शेकडो खोके होते. सदर दारु गोव्याहुन कर्नाटकात जात होती.

हेही वाचाः ZIKA VIRUS: झिका व्हायरसचा धोका; ‘या’ राज्यात सापडले १४ रुग्ण

माती असलेला कलंडलेला ट्रक शुक्रवारी काढण्यात आला, तर दारूच्या बाटल्या असलेल्या ट्रकमधील दारूचे खोके दुसऱ्या गाडीत भरण्याचं काम शुक्रवारी संध्याकाळी सुरू होतं. कलंडलेले ट्रक काढण्याच्या वेळी राष्ट्रीय महामार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस नसल्याने शुक्रवारी संध्याकाळी येथे वाहनाची कोंडी झाली.

हेही वाचाः JOB ALERT | रतन टाटांची कंपनी टीसीएस 40 हजार फ्रेशर्स घेणार

दोन्ही ट्रक ज्या ठिकाणी कलंडले त्या ठिकाणचा रस्ता खचला आहे. यापूर्वी इथे आणखीन तीन वाहनं कलंडली होती. खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी रस्ता विभागाकडे केली होती. मात्र इथे लक्ष देण्यात न आल्याने गाड्या कलंडण्याचं सत्र सुरूच असल्याचं स्थानिक पंचसदस्य गणेश गावकर यांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!