दुकान मालकास मारहाण, संशयिताविरूध्द गुन्हा

कामरखाजन-म्हापसा इथला प्रकार

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा : कामरखाजन म्हापसा येथे कनक ग्रॅनाईट या दुकानाच्या मालकास दंडुक्याने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयित दत्तराज तुयेकर (कामरखाजन) याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मारहाणीचा प्रकार मंगळवारी दुपारी 3.45 च्या सुमारास घडला. फिर्यादी आनंद प्रकाश व्यास यांच्या दुकानावर संशयित आरोपी आला. त्याने वैयक्तिक कारणावरून फिर्यादी व्यास यांच्यासोबत भांडण उरकून काढले. शिवीगाळ केली व दंडुक्याने त्यांना मारहाण केली. त्यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाला.

पोलिसांनी संशयित तुयेकर विरूध्द भा.दं.सं.च्या 324 कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हवालदार केशव नाईक करीत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!