अवघ्या 100 रुपयांसाठी माजी कुलगुरूंची हत्या !

ओडिशाच्या झारसुगुडा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : प्रख्यात पर्यावरणतज्ज्ञ आणि संबलपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू ध्रुवराज नायक यांना रविवारी ओडिशाच्या झारसुगुडा जिल्ह्यातील निवासस्थानाबाहेर ठार मारण्यात आले. एका व्यक्तीने त्याच्याकडे १०० रूपयांची मागणी केली. जेव्हा त्यांनी पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्या व्यक्तीने त्यांना घराबाहेर बोलावले आणि त्यांच्यावर कुहाडीने हल्ला केला आणि तो तेथून पळाला, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. प्रवीण ध्रुव असं आरोपीचं नाव आहे.

रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास हल्लेखोर प्रवीण ध्रुव नाईक यांच्या घरात घुसला. त्याने 100 रुपयांची मागणी केली. ते देण्यास नकार दिल्यावर त्यांना कुऱ्हाडीनं ठार करण्यात आलं. हल्लेखोर नंतर जंगलात पळाला. नाईक यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, झाडं तोडल्यावरून त्यांचे आणि गावकऱ्यांचे वाद होते. त्याही अनुषंगानं पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!