अखिल गोवा उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा. दिलीप धारगळकर

सचिवपदी प्रा. सुशांत तुयेकर; तर खजिनदार पदी प्रा. दीपक गावकर यांची निवड

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः अखिल गोवा उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण निवडणुक पार पडला. या निवडणुकीत संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा. दिलीप धारगळकर (सेंट. झेवियर उच्च माध्यमिक विद्यालय, म्हापसा) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर सचिवपदी प्रा. सुशांत तुयेकर (विवेकानंद उच्चमाध्यमिक विद्यालय, बाळ्ळी-कुंकळ्ळी), तर खजिनदार पदी प्रा. दीपक गावकर (पुरुषोत्तम वालावलकर उच्च माध्यमिक विद्यालय, म्हापसा) यांची निवड झाली. पणजी येथील डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये पार पाडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे माजी अध्यक्ष प्रा. अनंत पिसुर्लेकर उपस्थित होते.

हेही वाचाः गोव्यातुन परतणाऱ्या ऑक्सिजन टँकरला तिलारी घाटात अपघात

संघटनेचे अन्य पदाधिकारी

उपाध्यक्ष – प्रा. विठोबा बगळी (श्री. कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय, कोरगाव) बबन पाटील (रघुवीर आणि प्रेमावती साळकर उच्च माध्यमिक विद्यालय, चोडण) प्रा. किरण कंमार (श्री दामोदर उच्च माध्यमिक विद्यालय, मडगाव) प्रा. सुनील शेट (दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालय, सडा वास्को) संयुक्त सचिव – प्रा. नजकात शेख (वालावलकर उच्च माध्यमिक विद्यालय, म्हापसा) प्रा. गीताली कुडणेकर, प्रा. रावसाहेब राणे (श्री भूमिका उच्च माध्यमिक विद्यालय, पर्ये सत्तरी) प्रा. लक्ष्मण गावस (भाऊसाहेब उच्च माध्यमिक विद्यालय, वेळगे)

हेही वाचाः शिकाऱ्यांचीच केली शिकार ! दोडामार्गच्या सिंघम लेडी नदाफ यांची चमकदार कामगिरी

कार्यकारिणी सदस्य

प्रा. अनंत पिसुर्लेकर (वालावलकर उच्च माध्यमिक विद्यालय, म्हापसा) प्रा. झहीर शेख, प्रा. रॉजर फेराव, प्रा. मारिया डायस, प्रा. सुविधा तुयेकर (आरएमएस, मडगाव) संध्या कोरगावकर (आरएमएस, मडगाव) प्रा.अजय जोशी (धेंपे उच्च माध्यमिक विद्यालय कुजिरा), प्रा. मनोज नाईक, प्रा. जगन्नाथ कुडणेकर, प्रा. एलिन डीकॉस्ता (सेंट झेवियर उच्च माध्यमिक विद्यालय, म्हापसा) प्रा. संदीप आसगावकर (श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय, डिचोली), प्रा. जयराम केरकर (ज्ञानप्रसारक उच्च माध्यमिक विद्यालय, मुळगाव), प्रा. नामदेव नाईक (श्री कामाक्षी उच्च माध्यमिक विद्यालय, कुर्टी फोंडा), प्रा. रफी नदाफ (पी.ई.एस, फोंडा), प्रा. जगदीश शिरोडकर (रोझरी उच्च माध्यमिक विद्यालय, नावेली) यांनी निवड झाली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!