राज्यात कोरोना दाखल झाल्यापासून २४ मे पर्यंत २,४२१ जणांचा मृत्यू

६१.४२ टक्के मृत्यू ६० वर्षावरील नागरिकांचे; ६६.७० टक्के पुरुषांचे; ७५.७५ टक्के कोमोर्बिड व्यक्तींचे

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी:  जगात तसंच देशात थैमान घातलेल्या करोनाने राज्यातही उद्रेक झाला आहे. या पार्श्वभूमीवर करोनामुळे झालेल्या मृत्यूंचं विश्लेषण केलं असता, राज्यात करोना दाखल झाल्यापासून ते २४ मे पर्यंत २,४२१ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ६१.४२ टक्के मृत्यू ६० वर्षावरील नागरिकांचे झाले आहेत. तर ६६.७० टक्के पुरुषांचे मृत्यू झाले आहेत. एकूण मृत्यामधील ७५.७५ टक्के रुग्णांना अन्य आजार(कोमोर्बिड) होते. हॉस्पिटलात दाखल झालेल्या रुग्णांपैकी ४०.८९ टक्के मृत्यू आधीच झाल्याची किंवा तीन दिवसाच्या आत झाल्याची माहिती समोर आली आहे.

१ ते २४ मे पर्यंत राज्यातील सर्वाधिक बाधित तसंच मृत्यू

राज्यात २५ मार्च २०२० रोजी पहिला करोना बाधित सापडला होता. तर २२ जून २०२० रोजी पहिला बळी झाला होता. त्या दिवसापासून २४ मे २०२१ रोजी पर्यंत १,४७,८६१ करोना बाधित सापडले आहेत. यातील १,२९,१६२ रुग्ण बरे झाले आहेत. तर २२ जून ते २४ मे २०२१ रोजी पर्यंत २,४२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. राज्यातील सर्वाधिक बाधित तसेच मृत्यू १ ते २४ मे पर्यंत झाले आहेत. या कालावधीत ३८.४१ टक्के म्हणजे ५६,८०९ जण करोना बाधीत झाले आहेत. तर याच कालावधित ४८.१७ टक्के म्हणजे ६२,२२३ रुग्ण बरे झाले आहेत. या व्यतिरिक्त मागील २४ दिवसात एकूण मृत्यापैकी ५१.७५ टक्के म्हणजे १,२५३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मे महिन्या सर्वांत वाईट महिना ठरला आहे. राज्यातील वाढती संख्या तसंच मृत्यूची दखल घेऊन सरकारने नाईट कर्फ्यू तसंच करोना निर्बंध लागू केलेत, असं असतांना राज्यात करोनाची संख्या कमी होत नसल्यामुळे चिंता वाढली आहे.

हेही वाचाः पोलिस कॉन्स्टेबल, बिल्डर ते राजकारणी

आतापर्यंत सहा लहान मुलांचा करोनामुळे मृत्यू

राज्यात २४ मे पर्यंत २,४२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. राज्यात २२ जून २०२० रोजी ८५ वर्षीय रुग्णाचा पहिला मृत्यू झाला होता. एकूण मृत्यापैकी ६१.४२ टक्के म्हणजे १,४८७ मृत्यू ६० वर्षावरील नागरिकांचे झाले आहेत. या सर्वाधिक मृत्यू मागील २४ दिवसात म्हणजे ७२२ जणांचे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत सहा लहान मुलांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यात २० आक्टोबर २०२० रोजी झालेल्या तीन महिन्याचा बाळाचा मृत्यू सर्वांत कमी वयातील मृत्यू ठरला आहे. तर जुलै २०२० मध्ये १, आक्टोबर २०२० तीन, मार्च २०२१ आणि मे २०२१ मध्ये प्रत्येकी एका लहान बाळाचा मृत्यू झाले आहेत.

हेही वाचाः 17 वर्षाखालील 16 हजाराहून अधिक मुलांना दोन्ही लाटेत कोरोनाची लागण

६६.७० टक्के पुरुषांचे; तर ३३.३० टक्के महिलांचा मृत्यू

राज्यातील एकूणपैकी करोना मृत्यूपैकी ६६.७० टक्के म्हणजे १,६१५ पुरुषाचे मृत्यू झाले आहेत. तर ३३.३० टक्के म्हणजे ८०६ महिला रुग्णाचे मृत्यू झाले आहेत. या व्यतिरिक्त वरील कालावधीत १०४ रुग्णांचे मृत्यू हॉस्पिटलात दाखल होण्याआदीच झाले होते. तर ५३२ रुग्ण हॉस्पिटलात दाखल झाल्यानंतर २४ तासात मृत्यू झाले होते. तसंच १९३ रुग्ण दोन दिवसात तर १६१ रुग्ण तीन दिवसात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या व्यतिरिक्त मृत्यू झालेल्या पैकी १२ रुग्ण अज्ञात असून त्यांची अजून ओळख पटलेली नाही. त्यामुळे त्याचा मृतदेह हॉस्पिटलच्या शवागारात ठेवले आहेत. तसंच राज्यात करोनामुळे झालेल्या एकूण मृत्यामधील ७५.७५ टक्के म्हणजे १,८३४ रुग्णांना अन्य आजार(कोमोर्बिड) असल्याची माहिती समोर आली आहे.  

हेही वाचाः औषधांच्या कमतरतेची न्यायालयीन चौकशी करा

कोरोना मृत्यूची आकडेवारी

महिनाएकूण मृत्यू६० वर्षावरील मृत्यूपुरुषमहिलामृत इस्पितळात आणलेइतर आजार (कोमोर्बिड) असलेले मृत्यू.  
जून २०२००३०३०२०१०००३
जुलै २०२०४२२२२८१४०१३३
आगस्ट २०२०१४७९२११३३४११५.
सप्टेबर २०२०२३६१४७१७४६२१३१७९
आक्टोबर २०२०१७६१६३१२२५४०७१५३
नोव्हेंबर २०२०८४६१६२२२०५७६
डिसेंबर २०२०५१३७३५१६०३४७
जानेवारी २०२१२९१८२१०८००२९
फेंब्रुवारी २०२१२७१५१६११०१२३
मार्च २०२१३५१९१९१६०२३२
एप्रिल २०२१३३८१८८२२९१०९१६२४८
२४ मे २०२११२५३७२२७९४४५९४८८९६
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!