जणू लाईफ लाईन परतली…

स्टेडियमवर परतल्याने एफसी गोवाचे चाहते आनंदी

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल)चे मागील दोन पर्व हे बंद दरवाजाआड खेळवण्यात आली आणि त्यामुळे एफसी गोवाचे चाहत्यांना आपल्या संघाला चिअर करता आले नाही. पण, दोन वर्षांनंतर प्रेक्षकांसाठी स्टेडियमची दारे उघडली गेली आणि आता फलोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेले दिसले. चाहत्यांचे पुनरागमन हे आयएसएल हंगामातील एफसी गोवाच्या दमदार कामगिरीसाठी महत्त्वाचे ठरले आहे.एफसी गोवाचे दोन फॅन क्लब आहेत.
हेही वाचाःTarun Tejpal case : सुनावणी इन कॅमेरा घेण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली…

नियमांमुळे दोन वर्ष स्टेडियमवर येता आले नाही

पहिला एफसी गोवा फॅन क्लब आणि दुसरा दी ईस्ट लोवर आर्मी … या दोन्ही क्लब्सना करोना काळातील बायो बबल नियमांमुळे दोन वर्ष स्टेडियमवर येता आले नाही. एफसी गोवाला समर्थनासाठी हे क्लब कार रॅली काढतात आणि संघाच्या बसला सुरक्षा पुरवतात, इतकेच नाही तर संघाच्या सराव सत्रातही खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी हे हजर असतात. आता प्रेक्षकांचे पुनरागमन झाले आहे आणि ही गोष्ट समीर शिरोडकरला सुखावणारी आहे.
हेही वाचाःगोवा वेल्हा येथे गांजा जप्त; तरुण अटकेत…

आम्ही दोन्ही होम गेम्समध्ये क्लीन शीट ठेवली

समीर शिरोडकर हा एफसी गोवा विश्वासू आणि दी ईस्ट लोवर आर्मी क्लबचा सदस्य आहे. “जणू लाईफलाईनच परतली आहे,” असे समीर सांगतो. ‘आयएसएल गोव्यात होत होती आणि आम्ही ती पाहू शकलो नाही, हे आमच्यासाठी खरोखरच हृदयद्रावक होते. पण, झालं ते झालं… आता आम्ही पूर्वीप्रमाणेच स्टैंडवर परत येत आहोत आणि खेळाडूंना प्रोत्साहन देत आहोत. घरच्या मैदानावरील एफसी गोवाचा रेकॉर्ड तुम्ही पाहू शकता. आम्ही दोन्ही होम गेम्समध्ये क्लीन शीट ठेवली आहे. आणि दोन्ही सामने आरामात जिंकले आहेत.
हेही वाचाःचिंबल येथे हीट ॲन्ड रन अपघातात एकाचा मृत्यू…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!