फळाची अपेक्षा न ठेवणारे कलाकार सर्वश्रेष्ठ

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी
पेडणेः फळाची अपेक्षा न ठेवता अनेक कलाकार आपली कला सदर करून रसिकांची मनं जिंकत असतात. हे कलाकारा ईश्वराची सेवा करताना मनुष्यालाही समाधान देत असतात. अशा कलाकारांचा गौरव ज्यांच्या हातून होतो, त्या व्यक्तीचाही त्याचवेळी गौरव होत असतो, असे उद्गार मगोप नेते जीत आरोलकर यांनी मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या खास गौरव सोहळ्याला काढले.
सुरज गोवेकर यांचा खास गौरव
मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव उत्सवात मागची १९ वर्षं सलग कोणतंही मानधन न घेता सुरज गोवेकर हे स्वतःसोबत इतर गोमंतकीय कलाकारांसह विविध प्रकारची वाद्य वाजवणारे वादक गायक कलाकार आणून या ठिकाणी आपली कला सादर करतात. त्याचा मोबदला त्यांनी आजपर्यंत कधीच घेतलेला नाही. त्यासाठी सुरज गोवेकर यांचा खास गौरव आयोजित केला होता.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी मोरजी सर्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नाना ऊर्फ चंद्रो दाभोलकर, श्रीकृष्णा आस्कावकर,सल्लागार प्रसन्नकुमार शेटगावकर, खजिनदार सुर्यकांत पेडणेकर, दीपक शेटगावकर, घनश्याम शेटगावकर, दादी शेटगावकर आदी उपस्थित होते. विकास आजगावकर यांनी कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक केलं.
यावेळी राजेंद्र बोरकर, समता सुरज गोवेकर, अर्जुन सुरज गोवेकर, अजिंकेश नाईक आणि मुख्य गायक सुदेश नाईक यांच्या गायनाची मैफल झाली. यावेळी जीत आरोलकर यांच्याहस्ते सुरज गोवेकर यांचा स्मृती चिन्ह देऊन गौरव केला.