माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करावी

कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडेंना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करण्याचं आवाहन

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः राज्यात कोविड-19 परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर चाललीये. कोविड बाधितांसोबत कोविड मृत्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होतेय. हळुहळू कोरोना सगळ्यांचा आपला शिकार करतोय. त्यामुळे सामान्यांसोबत आमदार, मंत्र्यांमध्येही भीतीचं वातावरण पसरलंय. शनिवारी एक मंत्री कोरोनाचा शिकार झाला आहे. तशी माहिती त्या मंत्र्याकडूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

corona-eps
corona-eps

कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडेंना कोरोनाची लागण

राज्याच्या कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडेंचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने राजकीय वर्तुळात भीतीचं वातावरण पसरलंय. मंत्री गोविंद गावडेंनी आपण कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती स्वतः दिली आहे. तशी माहिती देणारी एक पोस्ट त्यांनी शनिवारी रात्री सोशल मीडियावर पोस्ट केलीये.

800x450 govind gawde

माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करावी

गोविंद गावडेंचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी लगेच सोशल मीडियावर पोस्ट करून त्याविषयी सगळ्यांना सूचित केलं. तसंच आपल्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपापली कोरोना चाचणी करून घ्यावी, असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.

गोविंद गावडे पोस्ट करताना म्हणालेत…

माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्यात कोरोनाची लक्षणं दिसल्याने मी चाचणी केली आमि माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. माझ्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल मात्र अजून आलेला नाही. मी आयझोलेशन स्वीकारलं असून जे लोक माझ्या संपर्कात आलेत त्यांनीही स्वतःची चाचणी करून घ्यावी, असं आवाहन गावडेंनी केलंय.

यावपूर्वी 26 मार्चला पणजीचे आमदार बाबुश मॉन्सेरात यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!