डार्क वेबद्वारे देशभर ड्रग्सचे रॅकेट चालवणाऱ्यांना अटक

टोळीतील ६ जणांना मुंबई एनसीबीने घेतले ताब्यात, १५ हजार एलएसडी ब्लॉट्स, २.५ किलो गांजा केला जप्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः डार्क वेबद्वारे देशभर ड्रग्सचे रॅकेट चालवणाऱ्यांना अटक करण्यात आलीए. टोळीतील ६ जणांना एनसीबीने ताब्यात घेतलंय. या कारवाईत १५ हजार एलएसडी ब्लॉट्स, २.५ किलो गांजा जप्त करण्यात आलाय. नोएडा येथे शिकणाऱ्या गोव्यातील युवकाच्या अटकेनंतर या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात मुंबईतील एनसीबीला यश आलंय.

2.5 किलो गांजा, 4.65 लाख रुपये जप्त

मिळालेल्या माहितीनुसार ड्रग्ज कार्टेलचे संपूर्ण देशात नेटवर्क असल्याची माहिती उजेडात आली आहे. आरोपी आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी क्रिप्टो करन्सीचा वापर करत होते. गेल्या दोन दशकातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. एलएसडी हे कृत्रिम रसायन आहे. दोन ठिकाणी केलेल्या छापेमारीत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे 15000 ब्लॉट्स जप्त करत 6 जणांच्या मुसक्या आवळल्यात. एनसीबीने या कारवाईत 2.5 किलो गांजा, 4.65 लाख रुपये आणि एका बँक अकाऊंटमध्ये डिपॉझिट केलेले 20 लाख रुपये जप्त केलेत. एलसीडी सिंथेटिक हा अंमली पदार्थ अत्यंत धोकादायक आहे. संपूर्ण देशभरात या पदार्थाची तस्करी करणारे आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत आहे.

कुठे-कुठे आहे नेटवर्क?

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार एससीडी ड्रग्जची तस्करीचे नेटवर्क पोलंड, नेदरलंड, यूएसए, दिल्ली-एनसीआर, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशात आहे. तस्करांनी आर्थिक देवाण-घेवाणसाठी क्रिप्टो करन्सी आणि डार्कनेटचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे.

डार्क नेट म्हणजे काय?

डार्क नेट म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून केली जाणारी अंमली पदार्थ, अश्लिल माग्री अथवा इतर काही बेकायदेशीर गोष्टींचे व्यवहार करणारी प्रणाली. अनेकदा मोठमोठे तस्कर कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींच्या देखरेखीपासून दूर राहण्यासाठी कांदा राउटर (ToR) च्या गुप्त मार्गांचा वापर करून इतर बेकायदेशीर क्रियाकलापांसाठी केला जातो.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!