राजीव गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त गोवा काँग्रेसने केली कोविडबाधितांची मदत

90,000 मास्क, 10,000 हॅंड सॅनिटायझर, 1000 ऑक्सिमीटर, 10,000 पाण्याच्या बाटल्यांचं केलं वाटप

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या 30वी पुण्यतिथीनिमित्त 21 मे या दिवशी राज्यात काँग्रेस पक्षातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर करून वडिलांना श्रद्धांजली वाहिली. त्यावर त्यांनी ‘सत्य, करुणा आणि प्रगती’ असं लिहिलं आहे. गोवा प्रदेश काँग्रेस समितीसह दोन्ही जिल्हा समित्या, युवा काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवा दल, एनएसयूआय आणि 38 ब्लॉक समित्या, पक्षाचे आमदार, झेडपी सदस्यांनी देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या 30 व्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली.

विविध कार्यक्रमांचं आयोजन

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या 30 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गोवा प्रदेश काँग्रेस समितीने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं. यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीकडून कोविड महामारीशी लढा देणाऱ्या लोकांना मदत साहित्य वितरित करण्यात आलं.

लोकांमध्ये मदत साहित्याचं वितरण

गोवा प्रदेश काँग्रेस समितीसह दोन्ही जिल्हा समित्या, युवा काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवा दल, एनएसयूआय आणि 38 ब्लॉक समित्या, पक्षाचे आमदार, झेडपी सदस्यांनी कोविड महामारीशी लढा देणाऱ्या लोकांना मदत साहित्य पुरवलं. यामध्ये सुमारे 90,000 मास्क, 10,000 हॅंड सॅनिटायझर, 1000 ऑक्सिमीटर, 10,000 हून अधिक पाण्याच्या बाटल्या, 1,000 हून अधिक अन्न आणि फळांची पाकिटे इत्यादी साहित्याचं वाटप केलं, असं जीपीसीसी व्हीपी ऑर्गनायझेशनचे एम. के. शेख यांनी सांगितलं.

प्रियंका गांधी वाड्रांनी वाहिली श्रद्धांजली

प्रियंका गांधी वाड्रांनीदेखील ट्विट करून वडिलांना श्रद्धांजली वाहिली. राजीव गांधींचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं की, जगात प्रेमापेक्षा मोठी कोणतीच शक्ती नाही, ‘दयेपेक्षा मोठं कोणतंच साहस नाही, करुणेपेक्षा मोठी कोणतीच शक्ती नाही आणि विनम्रतेपेक्षा मोठा कोणताच गुरू नाही.’

21 मे 1991 मध्ये झाली होती राजीव गांधींची हत्या

21 मे 1991 च्या रात्री 10 वाजून 21 मिनिटांनी तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदूरमध्ये निवडणुकीचा प्रचार करताना बॉम्ब स्फोट घडवून राजीव गांधींची हत्या करण्यात आली होती. एक महिला फुलांचा हार घेऊन राजीव गांधींच्या जवळ आली आणि त्या हारमध्ये असलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. या घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाला होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!