CORONA UPDATE | म्हापसा शहराला कोरोनाचा विळखा

विविध प्रभाग मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

म्हापसाः म्हापशात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात नवी कोरोना प्रकरणे आढळून आल्यानं संपूर्ण शहरालाच जणू कोरोना संसर्गाने वेढा घातलेला आहे. या अनुषंगाने म्हापशातील काही महत्त्वाच्या प्रभागांचा मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून समावेश करण्यात आलाय. या झोनमधील लोकांमध्ये लक्षणं आढळून आल्यास त्यांची तात्काळ चाचणी केली जाणार आहे तसंच ज्यांना लक्षणं आहेत त्यांनी तात्काळ घरीच विलगीकरणात राहण्याचं आवाहन केलंय. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधीचा आदेश जारी केलाय.

हेही वाचाः लॉकडाऊनच्या निर्णयाचे स्वागत, पण…

आरआरटी पथकाची स्थापना

उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी या भागासाठी रॅपिड रिस्पॉन्स टीम (आरआरटी) स्थापन केल्यात. या टीमकडून कोरोना संसर्ग झपाट्याने फैलावण्याची नेमकी कारणं काय याचा शोध घेतला जाणार आहे. अलिकडेच म्हापसा नगरपालिकेच्या निवडणूका पार पाडल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात सभा, बैठका, तसंच घरोघरी प्रचाराचे प्रकार घडलेत. त्यात निवडणूक निकालाच्या दिवशीही मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केल्याचंही पाहायला मिळालं होतं. आता निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर वेगवेगळ्या भागांत मिळालेल्या नव्या कोरोना प्रकरणांमुळे या संसर्गाच्या प्रसाराला निवडणूकाही जबाबदार ठरल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

हा व्हिडिओ पहाः रुग्णांना स्ट्रेचरवर, खूर्चीवर बसवून सुरु आहेत उपचार

कुठले प्रभाग कंटेन्मेंट झोन ?

खोर्ली- गंगानगर
एकता नगर
आल्तीनो-म्हापसा
हाऊसिंग बोर्ड, गणेशपुरी
दत्तवाडी
डांगी- कॉलनी
करासवाडा
धुळेर
शेट्येवाडा
गांवसवाडा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!