तानावडे म्हणतात, निर्बंध हवेच! याला लॉकडाऊनचे संकेत म्हणायचं का?

टू बी ऑर नॉट टू बी- मुख्यमंत्री डॉ. सावंत पेचा

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यात एकीकडे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत लॉकडाऊन करणारच नाही,असा हट्ट धरून बसलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लॉकडाऊनच्या बाजूने नाहीत आणि त्यामुळे राज्यात लॉकडाऊन करणार नाही हे ते पुन्हा पुन्हा सांगताहेत. त्यांना रात्रीच्या संचारबंदीसंबंधी कुणी विचारलं तर ते म्हणताहेत की तसं झालं तर पर्यटनावर परिणाम होईल. संचारबंदीही लागू करणे शक्य नाही. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत हे बोलत असतानाच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मात्र वेगळाच सुर आवळलाय. वाढत्या कोरोना प्रकरणांची दखल घेऊन पुढील दोन दिवसांत कडक निर्बंध जारी केले जातील,असे स्पष्ट संकेत त्यांनी दिलेत. खुद्ध पक्षाने मुख्यमंत्र्यांना तशी कल्पना दिल्याचेही तानावडे म्हणाले.

हेही वाचा – CORONA UPDATE | धक्कादायक । निवडणुकीच्या राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला दुप्पट

रूग्णसंख्येत प्रचंड वाढ

गोव्यात कोरोनाच्या रूग्णसंख्येने शुक्रवारी अचानक उचल खाल्ली. तब्बल 927 नवे रूग्ण सापडलेत. शंभर रूग्णांना गेल्या चोविस तासांत इस्पितळात दाखल करावं लागलंय. एवढेच नव्हे तर राज्यातील मृतांचा आकडा 6 वर पोहचलाय. ह्यात पाहील्यास एका होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रूग्णाचा समावेश आहे. अचानक त्याला स्वाशोच्छवास घेण्याचा त्रास जाणवू लागल्याने त्याला जीएमसीत पाठविण्यात आले. परंतु तिथे काहीच उपयोग झाला नाही. मृतांची आकडेवारी पाहीली तर आता 40 ते 50 वयोगटातील लोक कोरोनाचे बळी ठरू लागलेत. जीएमसी, ईएसआय, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ रूग्णांनी भरले आहे. एवढी ही भीषण परिस्थिती असताना मुख्यमंत्री डॉ. सावंत आपल्या हृदयावर दगड ठेवून आर्थिक परिस्थितीसाठी लॉकडाऊन जारी करणार नाही, अशी ताठर भूमिका घेऊन आहेत.

हेही वाचा – CORONA | कोरोनावरील घरगुती औषधाचा दावा किती सत्य?

सगळेच नरमलेत

देशभरात भासपशासित प्रदेशही कोरोनापुढे नरमले आहेत. लॉकडाऊन करणार नाही,अशी शेखी मिरवणारी अनेक राज्ये आता पटापट विकेंड संचारबंदी, चाचणी अहवाल सक्ती आदी पावले उचलू लागली आहेत. आपल्याकडे मात्र कोरोनाची प्रकरणे वाढत असताना देखील सरकार ढीम्मपणे काहीच करताना दिसत नाही. विशेष म्हणजे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली होणारी राज्य कार्यकारी समितीची बैठकही अलिकडच्या काळात होत नसल्याने सरकारने नेमके काय चालवले आहे, असा सवाल आता लोक करू लागलेत.

हेही वाचा – CORONA VACCINE | ‘रेमडेसिविर’मुळे खरंच कोरोना रुग्णांचा जीव वाचतो?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!