कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा गोव्याचा वेग चिंताजनक! पण गोंयकरांना त्याचं काही पडलंय का?

रुग्णवाढीचा पुन्हा एक नवा उच्चांक

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. देशातली ही कितवी लाट आहे, हे मोजयची ही वेळ नक्कीच नाही. वेळ आहे आताच खबरदारीची पावलं उचलण्याची. कोरोनामुळे गेल्या वर्षी झालेलं आर्थिक नुकसान लॉकडाऊन सारख्या पर्यायानं भरुन निघणार नाहीच. त्यामुळे अर्थचक्र सुरु राहणं नितांत गरजेचं आहेच. पण सोबतच कोरोना रोखण्याचंही आव्हान आहे. हे आव्हान पार पाडत असताना कोरोना रुग्णसंख्या आरोग्य यंत्रणेसमोरची आव्हानं वाढवते आहे. रोज नवे विक्रम रुग्णवाढीचे होत आहेत. आधी ३००, मग ४०० त्यानंतर ५०० मग ६०० आणि आता तर ९०० पेक्षा जास्त रुग्ण आढळून येण्याची भीती आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा वेग किती दिवसांवर आला आहे, याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे.

corona update

आकडेवारी काय सांगते?

राज्यात शुक्रवारी रुग्णवाढीनं नवा उच्चांक गाठला. तब्बल ९२७ नवे रुग्ण आढळून आलेत. १०० रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. २८२ रुग्ण कोरोनातून बरे झालेत. गेल्या २४ तासांच्या आकडेवारीनं रिकव्हरी रेट ८९.०२ टक्के इतका खाली आला आहे. तर तब्बल ६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या सगळ्याचा परिणाम सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीवर थेट पाहायला मिळतोय. सक्रिय रुग्णसंख्या आता ६ हजार ३२१वर पोहोचली आहे. सध्याच्या घडीला ३५७ रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहे.

हेही वाचा – तानावडे म्हणतात, निर्बंध हवेच! याला लॉकडाऊनचे संकेत म्हणायचं का?

राज्यात कोरोनाचे 6 बळी गेले असले तरी त्यातील दोघे जण हे सिंधुदुर्ग, बेळगावचे असल्याचं कळतंय. मृतांमध्ये एकूण ४ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णाचाही मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं नव्या रुग्णांपैकी अनेक जण हे होम आयसोलेशनमध्ये असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

हेही वाचा – CORONA | कोरोनावरील घरगुती औषधाचा दावा किती सत्य?

coronavirus-test-1606815937

ग्रामीण भागासोबत शहरातली कोरोना रुग्ण संख्या वाढते आहे. गोव्यात महाभयंकर वेगानं कोरोना पसरतो आहे. पण त्याचं गांभीर्य कुणालाच नाही असं आकडेवारीतून अधोरेखित होताना दिसतंय. सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणं, हात धूवत राहणं, या गोष्टींचं पालन खरंच होत असलं असतं तर कदाचित शहरी भागासोबत ग्रामीण भागात ज्या प्रकारे रुग्ण वाढत आहे, तशा पद्धतीनं रुग्णवाढ दिसली नसती.

हेही वाचा – CORONA UPDATE | धक्कादायक । निवडणुकीच्या राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला दुप्पट

वाढती रुग्णसंख्या आरोग्य यंत्रणेवर ताण टाकणारी तर आहेच. शिवाय गोंयकार किती बेजबाबदारपणे कोरोनाकडे पाहतात, हे दर्शवणारीही आहे. कोरोना व्हायरसचे बदलेले प्रकार, नवे म्युटेशन या सगळ्यात लसीकरणालाही महत्त्व आहेच. पण सगळ्यात जास्त महत्त्व आहे, ते संसर्ग रोखण्याला. गोव्यात पर्यटन सुरु ठेवून, कोरोना संसर्ग रोखायचा असेल, तर त्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क यांचा वापर कटाक्षानं व्हायला हवा. पण तसं होताना दिसत नाही.

corona-eps

सर्रास मास्क न घालता फिरणं, सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासणं, या प्रकारांनी येत्या काळात गोव्याची आरोग्य यंत्रणा कोलमडून पडण्याची भीती सर्वाधिक आहे. पण त्याचं खरंच गोव्यातील सामान्य लोकांना काही गांभीर्य आहे का?, हा खरा प्रश्न आहे. कारण जर गांभीर्य असतं, तर कोरोनाला रोखण्यासाठी अर्थचक्र सुरु ठेवून जबाबदारपणे गोव्यातील नागरीक वागताना, वावरताना दिसले असते. आता होत असलेली रुग्णवाढ, हे बेजबाबदार आणि बेशिस्तपणाचंच लक्षण आहे, असं दुर्दैवानं म्हणावंच लागेल.

हेही वाचा – Lockdownबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं मोठं विधान! म्हणाले…

प्रत्येक वेळी सरकारचीच जबाबदारी कशी?

सरकारनं, प्रशासनानं कडक निर्बंध घातले की त्यांच्यावर टीका करण्यासाठी विरोधक पुढे येतात. ते त्यांचं कामच आहे. त्यांनी ते करावंच. पण प्रत्येकवेळी जबाबदारी सरकारचीच नसते. लोकांचीही असते. समजूतदार लोकांनी कोरोनाच्या महामारीत हयगय करणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही. अशा समजूतदार लोकांनी दाखवलेल्या निष्काळजीपणामुळेच कोरोना रुग्णसंख्या वाढतेय.

यात पूर्ण चूक लोकांचीच आहे असंही मुळीच नाही. पण पूर्णपणे सरकारही चुकलंय, असं म्हणून जबाबदारी झटकताही येणार नाही. चुका दोन्हीकडून झाल्यात. आता तरी दोन्हीकडून जबाबदार वागणुकीची अपेक्षा आहे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जायला, फार वेळ लागणार नाही, हे नक्की. त्यामुळे जरा मागच्या तीन दिवसांत किती वेगानं रुग्णवाढ झाली आहे, त्यावर एक नजर टाका आणि लवकर भानावर या!

हेही वाचा – CORONA VACCINE | ‘रेमडेसिविर’मुळे खरंच कोरोना रुग्णांचा जीव वाचतो?

उत्तर गोव्यात किती रुग्ण?

डिचोली
14 एप्रिल – 110, 15 एप्रिल – 134, 16 एप्रिल – 143

साखळी
14 एप्रिल – 115, 15 एप्रिल -124, 16 एप्रिल – 165

पेडणे
14 एप्रिल – 114, 15 एप्रिल -134, 16 एप्रिल – 125

वाळपई
14 एप्रिल – 52, 15 एप्रिल -60, 16 एप्रिल – 88

म्हापसा
14 एप्रिल – 341, 15 एप्रिल -401, 16 एप्रिल – 426

पणजी
14 एप्रिल – 322, 15 एप्रिल -398, 16 एप्रिल – 414

हळदोणा
14 एप्रिल – 93, 15 एप्रिल – 116, 16 एप्रिल – 140

बेतकी
14 एप्रिल – 46, 15 एप्रिल – 52, 16 एप्रिल – 54

कांदोळी
14 एप्रिल – 344, 15 एप्रिल – 321, 16 एप्रिल – 416

कासारवर्णे
14 एप्रिल – 11, 15 एप्रिल – 19, 16 एप्रिल – 30

कोलवाळ
14 एप्रिल – 71, 15 एप्रिल – 86, 16 एप्रिल – 91

खोर्ली
14 एप्रिल – 118, 15 एप्रिल – 137, 16 एप्रिल – 121

चिंबल
14 एप्रिल – 180, 15 एप्रिल – 204, 16 एप्रिल – 228

शिवोली
14 एप्रिल – 162, 15 एप्रिल – 164, 16 एप्रिल – 162

पर्वरी
14 एप्रिल – 484, 15 एप्रिल – 558, 16 एप्रिल – 589

मये
14 एप्रिल – 33, 15 एप्रिल -32, 16 एप्रिल – 35

दक्षिण गोव्यात किती रुग्ण?

कुडचडे
14 एप्रिल -67, 15 एप्रिल -94, 16 एप्रिल – 91

काणकोण
14 एप्रिल -85, 15 एप्रिल -98, 16 एप्रिल – 97

मडगाव
14 एप्रिल -591, 15 एप्रिल -660, 16 एप्रिल – 725

वास्को
14 एप्रिल -239, 15 एप्रिल -271, 16 एप्रिल – 370

बाळ्ळी
14 एप्रिल -44, 15 एप्रिल -54, 16 एप्रिल – 57

कासावली
14 एप्रिल -152, 15 एप्रिल -174, 16 एप्रिल – 180

चिंचिणी
14 एप्रिल -99, 15 एप्रिल -110, 16 एप्रिल – 125

कुठ्ठाळी
14 एप्रिल -265, 15 एप्रिल -284, 16 एप्रिल – 345

कुडतरी
14 एप्रिल -87, 15 एप्रिल -89, 16 एप्रिल – 97

लोटली
14 एप्रिल -71, 15 एप्रिल -89, 16 एप्रिल – 106

मडकई
14 एप्रिल -42, 15 एप्रिल -46, 16 एप्रिल – 50

केपे
14 एप्रिल -34, 15 एप्रिल -36, 16 एप्रिल – 50

सांगे
14 एप्रिल -93, 15 एप्रिल -87, 16 एप्रिल – 89

शिरोडा
14 एप्रिल -82, 15 एप्रिल -102, 16 एप्रिल – 102

धारबांदोडा
14 एप्रिल -60, 15 एप्रिल -58, 16 एप्रिल – 73

फोंडा
14 एप्रिल -387, 15 एप्रिल – 380, 16 एप्रिल – 417

नावेली
14 एप्रिल -93, 15 एप्रिल – 89, 16 एप्रिल – 100

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!