आर्चबिशप फेलिप नेरी फेर्रावा यांनी घेतली नवनिर्वाचित राज्यपालांची भेट

पुष्पगुच्छ देऊन केलं अभिनंदन; पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्याचे नवनिर्वाचित राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांची आर्चबिशप फेलिप नेरी फेर्रावा यांनी भेट घेतली. राज्यपालांची भेट घेण्यासाठी आर्चबिशप फेलिप नेरी फेर्राव यांनी खास राजभवनाला भेट दिली. यावेळी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांनी राज्यपालांचं अभिनंदन केलं तसंच त्यांना सदिच्छा दिल्या.

हेही वाचाः RAIN UPDATE | उद्या पुन्हा मुसळधार

राज्यपालपदी नियुक्ती झाल्याने घेतली भेट

पी.एस.श्रीधरन पिल्लई यांनी १५ जुलै रोजी गोव्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. तसंच गोव्याच्या राज्यपालपदाची सर्व सुत्रं हाती घेतली. त्यांनी स्वीकारलेल्या या नव्या जबाबदारीबद्दल त्यांना सदिच्छा देण्यासाठी तसंच त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आर्चबिशप फेलिप नेरी फेर्राव यांनी शनिवारी राजभवनात जाऊन त्यांची भेट घेतली. येणाऱ्या वाटचालीत राज्यपालांना त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडताना यश मिळो अशी प्रार्थना केली.

हेही वाचाः येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाचा राजनीमा देणार? वाचा कारण काय?

15 जुलै रोजी घेतली राज्यपालपदाची शपथ

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची गेल्या 6 जुलै रोजी मिझोरममधून गोव्यात बदली झाली. १५ जुलै रोजी सकाळी 11 वा. दोनापावला येथील राजभवनात त्यांनी राज्यपालपदाची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली.

हा व्हिडिओ पहाः Video | POLITICS | ‘आप’च्या प्रतिमा कुतिन्होंना पोलिसांकडून समन्स

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!