खाजगी इस्पितळांसाठी सरकारी समन्वयकांची नेमणूक

उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर यांच्याकडून आदेश जारी

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजीः खाजगी हॉस्पिटलमधील कोविड रूग्णांच्या एडमिट प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी राज्य सरकारच्या उच्च शिक्षण संचालनालयाने प्रत्येक हॉस्पिटलसाठी समन्वयक आणि संयुक्त समन्वयकांची नेमणूक केलीए. राज्य सरकारने 21 खाजगी हॉस्पिटलच्या कोविड वॉर्डांचा ताबा घेतला असला तरी 13 खाजगी हॉस्पिटलवर हे समन्वयक नेमण्यात आलेत.

उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर यांच्याकडून आदेश जारी

उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर (आयएएस) यांनी हा आदेश जारी केलाय. या आदेशात खाजगी हॉस्पिटलातील कोविड रूग्णांच्या दाखल होण्याच्या प्रक्रियेचे समन्वयन करण्यासाठी ओवरऑल समन्वयक तसेच तांत्रिक आणि समुपदेशनासाठी वेगळ्या समन्वयकांची नेमणूक केलीए. या व्यतिरीक्त अन्य 13 खाजगी इस्पितळांसाठी समन्वयक आणि संयुक्त समन्वयक नेमले आहेत. हे सगळे अधिकारी खाजगी हॉस्पिटलात रूग्ण दाखल करून घेण्याच्या कामात मदत करणार आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!