२०१९ बॅचचे अधिकारी शिवेंदू भूषण यांची गोव्यात नियुक्ती

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आदेशही जारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : भारतीय पोलिस सेवेच्या (आयपीएस) ऍग्मू केडरच्या २०१९ बॅचचे अधिकारी शिवेंदू भूषण यांची गोव्यात नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाचे अव्वल सचिव राकेश कुमार सिंग यांनी सोमवार ९ रोजी जारी केला आहे.

गढ़वा – झारखंड येथील शिवेंदू भूषण यांनी खासगी कंपनीत सेवा बजावत असताना केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) २०१८ मध्ये परीक्षा दिली. त्यानंतर परीक्षेस उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना भारतीय पोलिस सेवेच्या (आयपीएस) ऍग्मू केडरच्या २०१९ बॅचचे अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.

आयपीएस अधिकारी शिवेंदू यांनी आरके पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी कानपूर येथील आयआयटी मधून इलेक्ट्रिक इंजीनियरिंग पदवी घेतली. खासगी कंपनीत सेवा बजावताना त्यानी २०१८ मध्ये युपीएससी परीक्षा दिली. त्यात १२०वा क्रमांक मिळाला. त्यानंतर उतीर्ण झाल्यानंतर त्यांची आयपीएस मध्ये निवड झाली. नंतर त्यांनी दुसऱ्यांदा युपीएससी परीक्षा दिली. त्यात त्यांना ८३ व्या क्रमांक मिळाला होता.

दरम्यान हैदराबाद येथे आयपीएस प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याची गोव्यात प्रोबेशनवर नियुक्ती करण्यात आली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!