चिंच भटवाडी मयेत स्वस्त धान्य दुकान सुरू करण्यासाठी अर्ज करा

नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने मागविले अर्ज

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्यातर्फे डिचोली तालुक्यातील चिंच भटवाडी मये येथे स्वस्त धान्य दुकान सुरू करण्यासाठी अर्ज मागविले आहेत. सुशिक्षित बेरोजगारांच्या सहकारी संस्था, मान्यताप्राप्त सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार, ग्रामपंचायत आणि अर्बन स्थानिक संस्था, अनुसूचित जाती/जमाती, स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग तसंच इतर व्यक्ती स्वस्त धान्य दुकान सुरू करण्यासाठी अर्ज करू शकतात.

हेही वाचाः ‘ब्लॅक फंगस’ साथीचा रोग

पुरेसा अनुभव आवश्यक

स्वस्त धान्याचे दुकान चालविण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा अनुभव असावा आणि ते आर्थिकदृष्ट्या सक्षम असावेत. सुशिक्षित बेरोजगार गोव्यातील कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. त्याचे नाव रोजगार विनिमय केंद्रात नोंद झालेले असावे. उमेदवार १८ ते ४५ वयोगटातील असावा. तसेच उमेदवाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती राज्यात स्वस्त धान्य दुकान चालविणारी नसावी.

हेही वाचाः आत्तापर्यंत गोव्याला 7.47 लाख लसींचा पुरवठा

25 जून 2021 पर्यंत अर्ज करावेत

पूर्ण भरलेले अर्ज डिचोली येथील नागरी पूरवठा आणि ग्राहक व्यवहार कार्यालयात २५ जून २०२१ पर्यंत सादर करावे, असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!