८८ कंत्राटी शिक्षकांच्या भरतीसाठी अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू…

राज्यातील सर्व भागशिक्षणाधिकारी कार्यालयात व्यवस्था उपलब्ध

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कंत्राटी प्राथमिक शिक्षकांसाठी इच्छूक उमेदवारांकडून अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यातील सर्व भागशिक्षणाधिकारी कार्यालयात ही व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. रजेवर असलेल्या शिक्षकांच्या जागी कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती करण्यात येणार असलेल्या ८८ शिक्षकांच्या भरतीसाठी शिक्षण खात्याने अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे मागवली आहेत.
हेही वाचाःMopa Airport : पेडणेकरांना फसवाल, तर पस्तावाल!

इच्छुक उमेदवारांनी ‘ही’ कागदपत्रे सादर करावी

दरम्यान, अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी कौशल्य चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी गुरुवारी यासंदर्भातील नोटीस जारी केली होती. रजेवर असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या जागी कंत्राटी पद्धतीवर ८८ शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या मुलाखती व इतर प्रक्रिया ७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याचे शिक्षण खात्याने अगोदरच जारी केले होते. त्यानुसार यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्जासोबत दहावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, बारावीचे गुणपत्रक आणि उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, डीएड, बीएडचे प्रमाणपत्र, शिक्षक पात्रता चाचणीचे प्रमाणपत्र, जन्म दाखला, पत्ता, गोव्यातील १५ वर्षांचा रहिवाशी दाखला, रोजगार नोंदणी प्रमाणपत्र तसेच शिकवण्याचा अनुभव असलेले प्रमाणपत्र संबंधित विभागाच्या भागशिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करावे, असे नोटिशीत म्हटले आहे.
हेही वाचाःSupreme Court : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!

सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत उमेदवारांच्या मुलाखती​

उमेदवारांच्या मुलाखती​ ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहेत. काणकोणमध्ये ५, धारबांदोड्यात ९, बार्देशमध्ये १२, डिचोलीत ६, केपेत ८, मुरगावात १, पेडणेत ५, फोंड्यात १२, सासष्टीत ७, सांगेत ३, तर सत्तरी आणि तिसवाडी​ या दोन तालुक्यांत प्रत्येकी १० कंत्राटी शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे, असेही शिक्षण संचालकांनी नोटिशीत म्हटले आहे.
हेही वाचाः‘कर्लिस’चा चालक एडविन नुनीस आंतरराज्य ड्रग्ज पुरवठादार…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!