लोकायुक्तासमोरील दाव्यांच्या तक्रारदारांना आवाहन

पुढील तारखेसंबंधी पत्रव्यवहार [email protected] या ई-मेल आयडीवरून पाठविण्याची विनंती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोवा लोकायुक्तच्या आदेशानुसार गोवा लोकायुक्त संस्थेचे निबंधक शिवदास के. गावणेकर यांनी विविध दाव्यांचे तक्रारदार/अर्जदार तसंच प्रतिवादींना दाव्यांच्या पुढील तारखेसंबंधी पत्रव्यवहार [email protected]  या ई-मेल आयडीवरून पाठविण्याची विनंती केली आहे.

हेही वाचाः विरोधकांनी टीकाच केली; आम्ही ‘टीका उत्सव’ केला

वर्ष २०१७ मध्ये आणि त्यापूर्वी दावे सादर केलेले तक्रारदार, अर्जदार २२ जुलै २०२१ ते ४ ऑगस्ट २०२१ दरम्यानचा स्लॉटसाठी विनंती करू शकतात. त्याचप्रमाणे वर्ष २०१८ मध्ये सादर केलेल्या दाव्यासाठी ५ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२१ आणि वर्ष २०१९ व त्यानंतरच्या दाव्यांसाठी ३० ऑगस्ट ते ३१  डिसेंबर २०२१ दरम्यान स्लॉटसाठी विनंती करू शकतात.

हेही वाचाः टिंटेड काचा हटवायला लावणारच; जुझे फिलीप डिसोझांच्या घोषणेचं स्वागत

गोवा लोकायुक्त संस्थेच्या रजिस्ट्रारच्या नावे पाठविण्यात येणाऱ्या ई-मेलमध्ये केस नंबर, मागील सुनावणीची तारीख आणि सुनावणीसाठी पुढील तारखेची माहिती असावी. तक्रारदार आणि उत्तरदात्यांनी/विरोधी पक्षांनी त्यांचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी रजिस्ट्रारकडे पुढील तारखेसाठी सादर करावा, असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!